Governor Ramesh Bais : विकसित भारतासाठी शहराप्रमाणे ग्रामीणमध्येही आरोग्‍यसेवा पोचवा : रमेश बैस

Governor Ramesh Bais : आरोग्‍य सुविधांमध्ये आलेल्‍या आधुनिकतेने ‘मेडिकल टुरिझम’ला चालना मिळत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने आरोग्‍य सुविधा पोचलेल्‍या नाहीत.
Minister of Medical Education Hasan Mushrif, Vice-Chancellor of Belgaum KLE Academy of Higher Education and Research Dr. Nitin Gangane, Vice-Chancellor Lieutenant General (retired) Dr. Madhuri Kanitkar, Vice-Chancellor Milind Nikumbha, Dr. Dinesh Waghmare, Controller of Examinations Dr. Sandip Kadu, Registrar Rajendra Bangal and dignitaries.
Minister of Medical Education Hasan Mushrif, Vice-Chancellor of Belgaum KLE Academy of Higher Education and Research Dr. Nitin Gangane, Vice-Chancellor Lieutenant General (retired) Dr. Madhuri Kanitkar, Vice-Chancellor Milind Nikumbha, Dr. Dinesh Waghmare, Controller of Examinations Dr. Sandip Kadu, Registrar Rajendra Bangal and dignitaries.esakal

Governor Ramesh Bais : आरोग्‍य सुविधांमध्ये आलेल्‍या आधुनिकतेने ‘मेडिकल टुरिझम’ला चालना मिळत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने आरोग्‍य सुविधा पोचलेल्‍या नाहीत. २०४७ पर्यंत विकसित देशांच्‍या यादीत भारताचे नाव समाविष्ट करण्याच्‍या अनुषंगाने शैक्षणिक व आरोग्‍य क्षेत्राची भूमिका महत्त्वाची ठरेल. (nashik Governor Ramesh Bais statement of For developed India marathi news)

विकसित भारत घडवायचा असेल, तर शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्‍य सुविधा उपलब्‍ध करून द्या, असे आवाहन राज्‍यपाल तथा महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना केले. मधुमेह, कर्करोगासह इतर व्‍याधी वाढत असून, आजारांना प्रतिबंध करणारे संशोधन करण्याचेही आवाहनही त्‍यांनी केले. महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या २३ व्‍या दीक्षान्त समारंभाप्रसंगी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधताना ते बोलत होते.

वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा विद्यापीठाचे प्रति-कुलपती हसन मुश्रीफ, बेळगावमधील केएलई अॅकॅडमी ऑफ हायर एज्‍युकेशन ॲन्ड रिसर्चचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विद्यापीठाच्‍या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी उपस्‍थित होते.

राज्यपाल बैस म्‍हणाले, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत आमूलाग्र बदल होत असून, मातृभाषेतून शिक्षणाची संधी मिळणार आहे. यामुळे एमबीबीएससमवेत इतर वैद्यकीय अभ्यासक्रम मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्‍ध होतील. यामुळे विद्यार्थ्यांसाठी संधीचे दालन खुले होतील, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Minister of Medical Education Hasan Mushrif, Vice-Chancellor of Belgaum KLE Academy of Higher Education and Research Dr. Nitin Gangane, Vice-Chancellor Lieutenant General (retired) Dr. Madhuri Kanitkar, Vice-Chancellor Milind Nikumbha, Dr. Dinesh Waghmare, Controller of Examinations Dr. Sandip Kadu, Registrar Rajendra Bangal and dignitaries.
Governor Ramesh Bais : युवकांच्या रोजगारासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा - राज्यपाल रमेश बैस

कुलगुरू डॉ. कानिटकर म्‍हणाल्‍या, की दीक्षान्त समारंभानंतर लगेचच विद्यार्थ्यांना आपले प्रमाणपत्र डिजिलॉकरवर उपलब्‍ध होणार आहे. ई-प्रबोधिनी, डिग्रीप्‍लस व यांसारख्या योजना विद्यार्थ्यांसाठी प्रभावी ठरतील, असा विश्‍वास व्‍यक्‍त करताना त्‍यांनी विद्यापीठाच्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली.

डॉ. गंगणे म्‍हणाले, की जीवनात आलेली आव्‍हाने तुम्‍हाला घडवतील. त्‍यामुळे कठोर मेहनतीची तयारी ठेवताना ध्येयाकडे वाटचाल करत राहावी. तर डॉ. ख्रिस्तोफर डिसूझा म्‍हणाले, की विद्यापीठाने केलेला सन्मान माझ्यासाठी उल्लेखनीय आहे. आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल विद्यापीठाने दखल घेऊन माझा जो सन्मान केला त्याबद्दल ऋणी आहे. जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन केले. परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी आभार मानले.

मनुष्यबळ निर्मितीचे आव्‍हान

जागतिक आरोग्‍य संघटनेच्‍या गुणांकनांनुसार लोकसंख्येच्‍या तुलनेत डॉक्‍टरांची संख्या कमी आहे. तसेच जर्मनी, अमेरिका यांसारखे प्रगत देश परिचारिका व इतर कुशल मनुष्यबळासाठी भारतावर अवंलबून आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात डॉक्‍टर तसेच पॅरामेडिकल क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्मितीचे आव्‍हान विद्यापीठ व संबंधित यंत्रणांनी यशस्वीरीत्या पेलावे, अशी अपेक्षा बैस यांनी व्‍यक्‍त केली.

Minister of Medical Education Hasan Mushrif, Vice-Chancellor of Belgaum KLE Academy of Higher Education and Research Dr. Nitin Gangane, Vice-Chancellor Lieutenant General (retired) Dr. Madhuri Kanitkar, Vice-Chancellor Milind Nikumbha, Dr. Dinesh Waghmare, Controller of Examinations Dr. Sandip Kadu, Registrar Rajendra Bangal and dignitaries.
Governor Ramesh Bais News: आव्‍हानांना संधीमध्ये रुपांतरित करत व्‍हा यशस्‍वी : राज्‍यपाल रमेश बैस

शासकीय महाविद्यालये, मनुष्यबळाची पूर्तता : मुश्रीफ

मंत्री हसन मुश्रीफ म्‍हणाले, की राज्यातील प्रत्येक जिल्ह्या‍त वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, नर्सिंग व ‘आयुष’अंतर्गत सर्वच विद्याशाखांच्या महाविद्यालयांना मान्यता, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्‍धतेचा प्रयत्‍न आहे. ‘एमपीएससी’मार्फत भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. तसेच पदवी प्राप्त केल्‍यानंतर आता रुग्‍णसेवा करताना गोरगरीब रुग्‍णांना दिलासा द्यावा, असे आवाहन त्‍यांनी उपस्‍थित स्‍नातकांना केले.

दीक्षान्त समारंभातील ठळक नोंदी...

* आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. ख्रिस्टोफर डिसूझा यांना डी. लिट. पदवी प्रदान.

* विविध विद्याशाखांच्या १२ हजार ४८६ स्नातकांना पदवी प्रदान.

* १११ विद्यार्थ्यांना एकूण १३९ सुवर्णपदक प्रदान.

* २६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान.

* राज्यपालांच्‍या हस्ते ऑनलाइन पद्धतीने ’ई-प्रबोधिनी’, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पुस्तिकेच्‍या ब्ल्यू प्रिंटचे प्रकाशन. (latest marathi news)

Minister of Medical Education Hasan Mushrif, Vice-Chancellor of Belgaum KLE Academy of Higher Education and Research Dr. Nitin Gangane, Vice-Chancellor Lieutenant General (retired) Dr. Madhuri Kanitkar, Vice-Chancellor Milind Nikumbha, Dr. Dinesh Waghmare, Controller of Examinations Dr. Sandip Kadu, Registrar Rajendra Bangal and dignitaries.
Governor Ramesh Bais: राज्यपालांच्या दौऱ्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com