Nashik Graduate Election Result : सत्यजीत तांबेंनी गड राखला; मविआच्या शुभांगी पाटील यांचा पराभव

Nashik Graduate Election Result
Nashik Graduate Election Resultesakal

नाशिक : नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रावर 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले. (Nashik Graduate Election Result Satyajit Tambe leading in first round of vote counting new)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

विभागात 49.28 टक्के मतदान झाले. आता सर्वांनाच या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. आज (ता. २) मतदानाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली असून मतमोजणीच्या पहिल्या फेरीची आकडेवारी समोर आली आहे.

फेरी पहिली

पहिल्या फेरीच्या आकडेवारीनुसार सत्यजित तांबे आघाडीवर असून पहिल्या फेरीत त्यांना 15784 मते मिळाली आहे. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पाटील यांना 7862 मते मिळाली आहेत. यासह इतर 14 उमेदवार पहिल्या फेरीत एक हजाराचा टप्पाही पार करु शकले नाहीयेत.

Nashik Graduate Election Result
Nashik Graduate Election Result : नाशिक पदवीधर निवडणूकीची मतमोजणी सुरू; पाहा Photos

दुसऱ्या फेरीतही तांबेंची आघाडी

दुसऱ्या फेरीच्या निकालातही सत्यजीत तांबे आघाडी राखली असून तब्बल दुप्पट मतांनी प्रतिस्पर्धी शुभांगी पाटील यांना मागे सारले आहे. दुसऱ्या फेरीत सत्यजीत तांबे यांना 31009 मते तर शुभांगी पाटील यांना 16316 मते मिळाली आहेत. यासह इतर 14 उमेदवार दुसऱ्या फेरीत एक हजाराचा टप्पाही पार करु शकले नाहीयेत.

दुसऱ्या फेरीनंतर तब्बल 5445 मते अवैध असल्याचे समोर आले आहे.

Nashik Graduate Election Result
Graduate Election Result : आहे ग्रॅज्युएट तरी..! पदवीधर मतदानात मोठ्या संख्येने मतपत्रिका बाद

आकडेवारी तिसऱ्या फेरीची

तिसऱ्या फेरीत सत्यजीत तांबेंना 45660 मते मिळाली आहेत तर शुभांगी पाटील यांना 24927 मते मिळाली आहेत. तिसऱ्या फेरी दरम्यान अवैध मतांची संख्या ही 8378 वर पोचली आहे.

Nashik Graduate Election Result
Graduate Election Result : तांबे-पाटील हाय व्होलटेज सामना, नाशिक पदवीधर मतमोजणीला वाहताहेत अफवांचे वारे

आकडेवारी चौथ्या फेरीची

चौथ्या फेरीत सत्यजीत तांबेंना 60161 मते मिळाली आहेत तर शुभांगी पाटील यांना 33776 मते मिळाली आहेत. यासह इतर उमेदवारांमध्ये रतन बनसोडे आघाडीवर असून त्यांना 2297 मते मिळाली आहेत. चौथ्या फेरीदरम्यान अवैध मतांची संख्या ही 11240 वर पोचली आहे

आकडेवारी पाचव्या फेरीची

पाचव्या फेरी अखेर सत्यजित तांबे यांना मिळालेली मते 68 हजार 999 तर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली. एकूण 12997 मते अवैध ठरली.

पाचव्या फेरी अखेर सत्यजित तांबे यांना मिळालेली मते : 68 हजार 999

महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना मिळालेली मते : 39 हजार 534

एकूण झालेले मतदान : 1 लाख 29 हजार 615 अ

अवैध ठरलेली मते : 12,997

वैध ठरलेली मते : 1 लाख 16 हजार 618

Nashik Graduate Election Result
Nashik Graduate Election Result : सत्यजीत तांबेनी उधळला विजयाचा गुलाल; 29 हजार मतांनी विजयी; पाहा Photos

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com