esakal | पोलिसांच्या मनमानीविरोधात व्यापाऱ्यांचा आजपासून बंद
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसांच्या मनमानीविरोधात व्यापाऱ्यांचा आजपासून बंद

पोलिसांच्या मनमानीविरोधात व्यापाऱ्यांचा आजपासून बंद

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना महामारीच्या काळात ‘ब्रेक द चेन’मोहिमेच्या नियमाखाली पोलिसांकडून सुरू असलेल्या अरेवारीच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ३) नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेने बंदचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: नाशिक महापालिका उभारणार एअर ऑक्सिजन प्लांट

संघटनेतर्फे या संदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन दिले असून, त्यानुसार पोलिसांच्या अडवणुकीविरोधात किराणा व्यावसायिकांनी दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना निर्बंधांच्या काळात अत्यावश्यक सेवेत किराणा दुकाने उघडी ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. सकाळी सात ते अकरापर्यंत दुकान सुरू ठेवण्याचा नियम असल्याचे जाहीर झाले आहे. मात्र, शासनाच्या अटी व नियमांचे पालन करूनही जीवनावश्‍यक किराणा दुकानदारांची पोलिसांकडून अडवणूक होत असल्याची व्यावसायिकांची तक्रार आहे.

हेही वाचा: खासदारांची सात हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन गेली कुठे? भाजपचा शिवसेनेवर निशाणा

सकाळी सात ते अकरा दुकान सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी दुकानात येऊन अरेरावी करतात. दुकान सील करण्याचा धाक दाखवीत दुकानदारांकडून वसुली केली जाते. दुकान वेळेत बंद केले नाही. दुकानातील लोकांनी मास्कच लावलेला नाही. अशा अडवणुकीमुळे उद्यापासून सर्व किराणा दुकानदारांनी दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

loading image