Dada Bhuse : नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असून, विद्यमान खासदारही आमच्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे आम्ही ही जागा भाजपला कदापी सोडणार नाही, असे प्रत्युत्तर देत पालकमंत्री दादा भुसे यांनी भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लावला. सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादा भुसे रविवारी (ता. २५) नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. ()
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी नाशिकच्या जागेवर भाजपने दावा करणे गैर नाही. तसेच मागणी करण्यासंदर्भातही काही गैर नसल्याचे वक्तव्य केल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे. पालकमंत्री भुसे नाशिक दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेकडे असून, त्यावरील आमचा दावा कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धुळ्याची जागा शिवसेनेकडे घेतानाच नाशिक भाजपाला सोडण्याच्या चर्चेवर बोलताना असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगत भुसे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे राज्यातील जागावाटपाचा निर्णय हे तिन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते घेतील. शिवसेनेपुरते बोलायचे झाल्यास अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच असेल, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हा छोट्या पक्षांचा वापर करून घेत असल्याच्या आरोपाला उत्तर देताना राजकारणात प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. तसेच निवडणुकांवेळी छोट्या-मोठ्या पक्षांची मदत घेणे अभिप्रेत असते, असे भुसे म्हणाले.
‘तुतारी’ला माझ्या शुभेच्छा
राष्ट्रवादी काँग्रेस शदर पवार गटाला ‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी तुतारीला शुभेच्छा दिल्या. अनावरण सोहळ्यावेळी काही जण तुतारी वाजविण्याची केवळ अॅक्शन करत होते. आवाज मात्र रेकॉर्डिंग केलेला ऐकू येत होता, असा टोला भुसे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता लगावला. खासदार शरद पवार हे पक्ष चिन्ह अनावरणानिमित्त ४० वर्षांनंतर रायगडावर गेल्याबद्दल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलेली टिपण्णी योग्य असल्याचे भुसे म्हणाले. (latest marathi news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.