Gudi Padwa 2024 : हिंदू नववर्षाचे आज दिमाखदार स्वागत; पाडवा पहाट, सुरमयी संगीत सभा

Gudi Padwa : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्ष मंगल पर्वाचे भव्य स्वागत करण्यासाठी भव्य आणि दिमाखदार शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2024esakal

Gudi Padwa 2024 : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्ष मंगल पर्वाचे भव्य स्वागत करण्यासाठी भव्य आणि दिमाखदार शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमात पाडवा पहाट, सुरमयी संगीत सभेचा आस्वाद नाशिककरांना घेता येणार आहे. काळाराम मंदिर ते पाडवा पटांगण या मार्गावरून शोभायात्रा निघणार असून यंदाचे काळाराम मंदिर स्वागत यात्रेचे ९ वे वर्ष आहे. (nashik Gudi Padwa 2024 Welcome Hindu New Year )

यात्रेत हिरकणी लेझीम पथक, राणी लक्ष्मीबाई खड्ग पथक, तानाजी मालुसरे दंड पथक, आरंभ ढोल ताशा पथक, धर्म ध्वज पथक, अनंत विजय शंखनाद पथक पथके सहभागी होणार आहेत. महर्षी गौतम गोदावरी वेद प्रतिष्ठानचे २१ विद्यार्थी विधिवत पूजन होत असताना मंत्रोच्चारात करणार आहे. या यात्रेत विविध संस्था सहभागी होणार आहेत.

२५१ तुळशीच्या रोपांचे वाटप, सायकलिस्ट फाउंडेशनचे ४० सायकलिस्ट पारंपारिक वेशभूषेसह सायकल चालवत काळाराम मंदिर स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत. भगूर येथील चार पहिलवान मुली यात्रेमध्ये कुस्तीचे सादरीकरण करणार आहेत. यात्रेत लेझीम पथक, तलवार पथक, लाठी काठी पथक, ढोल ताशा पथक, ध्वजपथक हे कलाप्रकार सादर होणार आहेत.

मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके

शोभायात्रेत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, दंडयुद्धाची प्रात्यक्षिक, लेझीम, ढोल ताशा पथकाचा जल्लोष, भगवा ध्वज दिमाखात घेऊन चालणारे धर्म ध्वज पथक, लाठी काठीचे प्रात्यक्षिके सदर करण्यात येणार आहेत. खुटवडनगर, माऊली लॉन्स मंगल कार्यालय, कामटवाडे, इंदिरानगर या सर्व भागातून सकाळी ७ वाजता सर्व शोभायात्रा निघणार आहेत. (latest marathi news)

Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला तांब्या, कडुलिंब, आंब्याची पाने या सर्व गोष्टीचे शास्त्रीय महत्व काय? जाणून घ्या

नववर्ष स्वागत समितीतर्फे नाशिककरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महात्मानगर नववर्ष स्वागत समिती (पश्चिम) तर्फे स्वागत मिरवणूक सकाळी ६.३० वाजता निघणार आहे. मंगल वेषभूषा करून मिरवणुकीत सामील व्हावे तसेच मिरवणूक मार्गात सडा रांगोळी काढून मिरवणूचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सावाना इंदिरानगर शाखेचे उद्‌घाटन

सार्वजनिक वाचनालयाच्या बल्लाळ क्लासेस, श्यामकुंज बंगला, इंदिरानगर येथील शाखेचे आज सकाळी १० वाजता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्‌घाटन होत आहे. याप्रसंगी आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त हर्षद आराधी, जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त अनुश्री आराधी, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा दिलीप फडके, अविनाश बल्लाळ व सावाना कार्यकारी मंडळ उपस्थित राहणार आहेत.

ऋतुरंग भवन

नाशिक रोड येथील ऋतुरंग भवनमध्ये पहाटे ५.३० वाजता शास्त्रीय गायिका अपूर्वा गोखले व पल्लवी जोशी या भगिनींची जुगलबंदी रंगणार आहे. त्यांना ज्ञानेश्वर सोनवणे (संवादिनी), स्वप्नील भिसे (तबला) संगत करणार आहे.

Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला तांब्या, कडुलिंब, आंब्याची पाने या सर्व गोष्टीचे शास्त्रीय महत्व काय? जाणून घ्या

राजा शिवाजी केंद्र

राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र व स्वरालय म्युझिक ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्षाच्या निमित्ताने पाडवा पहाट आज सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तसेच संस्कार भारती व नाशिक महानगर आयोजित सूरमयी संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता शंकराचार्य संकुलातील नानासाहेब ढोबळे सभागृहात भावगीत, भक्तिगीत, चित्रसंगीत, नाट्यसंगीत गाण्यांची मैफल आयोजित करण्यात आली आहे.

श्रीमद् देवी भागवत कथा

रविवार पेठेतील राठी वाड्यातील ओशिया माता मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त ९ ते १७ एप्रिल दरम्यान श्रीमद् देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी २ ते ६ दरम्यान राजेंद्र महाराज तुपे कथा सांगणार आहेत.

Gudi Padwa 2024
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, चांदीला लकाकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com