Nashik Gurukul Ashram Case : संशयित नराधमाच्या घरातून एअरगन जप्त

Crime News
Crime NewsSakal
Updated on

नाशिक : म्हसरूळ येथील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील सात मुलींवरील लैगिंक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या नराधम संस्थाचालकाच्या सटाण्यातील घरातून एअरगन जप्त करण्यात आली आहे. ही गन तांत्रिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी दाखल सातव्या गुन्ह्यासंदर्भात पीडित मुलीचा जबाब इनकॅमेरा नोंदविण्यात आला आहे.

Crime News
Dada Bhuse : सर्वपक्षीय नेते का करताय मंत्री दादा भुसेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; सविस्तर जाणून घ्या

संशयित नराधम हर्षल बाळकृष्ण मोरे (वय ३२, रा. मानेनगर, म्हसरूळ) याच्या पोलिस कोठडीची मुदत येत्या मंगळवारी (ता. ६) संपत आहे. म्हसरूळ पोलिसांत ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात मुलींवर अत्याचार केल्याचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यात संशयित मोरेने पीडितांवर एअरगनचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले होते. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या सूचनेनुसार सरकारवाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

या प्रकरणात सातही पीडितांचे इनकॅमेरा जबाब नोंदविले जात आहेत. म्हसरूळ पोलिस ठाण्यात यासंदर्भात दाखल असलेल्या सातव्या गुन्ह्यात तपास पथकाने शनिवारी (ता. ३) आश्रमाचा पंचनामा केला. त्याची झडती घेतली. त्यात नव्याने काही आक्षेपार्ह आढळले नसून आता सातही गुन्ह्यांची साखळी जोडण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. सदरील आश्रम सीलबंद करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिस संस्थेच्या कागदोपत्री असलेल्या विश्वस्तांची चौकशी करीत आहेत.

Crime News
Accident News : भरधाव वेग बेतला जिवावर; झाडावर आदळून दुचाकीस्वार ठार

‘आदिम’च्या निवेदनाची दखल

आदिम संघटनेने पोलिस आयुक्तांना निवेदन देत काही बाबींचा तपास होत नसल्याची तक्रार केली होती. या तक्रारीत संशयित मोरे याच्याकडे पिस्तुल असल्याचे म्हटले होते. परंतु तोपर्यंत पोलिस तपासात ही बाब आली नव्हती. त्यानुसार पोलिसांनी संशयिताच्या सटाणा येथील घराची झडती घेतली असता, त्याठिकाणी एअरगन पोलिसांच्या हाती लागली आहे. सदरील गनचा वापर संशयिताने केव्हा-केव्हा केला याचे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.

Crime News
Maharashtra- Gujrat : नाशिक जिल्ह्यातील गावांना 'या' कारणामुळे व्हायचयं गुजरातमध्ये सामील

चित्रा वाघ यांनी घेतली भेट

भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची पोलिस आयुक्तालयात भेट घेतली. त्यांनी म्हसरूळ येथील आश्रमाच्या अत्याचार प्रकरणाची चौकशी केली. सुरू असलेल्या तपासाबाबत समाधान व्यक्त करीत आश्रमशाळांमधील प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com