Gurumauli Annasaheb More : नामस्मरणातच सर्व चरित्राची साठवणूक : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

Gurumauli Annasaheb More : खरे म्हणजे, नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही. काम करीत असताना उगाचच इतर विचार मनात येतात.
Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb Moreesakal

Gurumauli Annasaheb More : खरे म्हणजे, नामस्मरण करण्याच्या आड काहीच येत नाही. काम करीत असताना उगाचच इतर विचार मनात येतात. मग काम करीत असताना नामस्मरण करायला हरकत नसावी. उगाच दुसरे विचार करण्यापेक्षा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करणेच योग्य आहे. वेळ मिळताच तो व्यर्थ गप्पागोष्टीत न घालविता नामस्मरण करावे. शंका न ठेवता, श्रद्धा ठेवून नामस्मरण करावे. (nashik Gurumauli Annasaheb More statements of Storage of all characters in Namasmaran marathi news)

नामस्मरणाचा अर्थ आपल्याला जरी कळला नाही, तरी तो महाराजांना कळतो. म्हणून नामस्मरणाचे महत्त्व कळो वा न कळो, नामस्मरण करीत राहावे, असे दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता. १३) सांगितले. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी साप्ताहिक सत्संग झाले. या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी मार्गदर्शन केले.

गुरुमाउली मोरे म्हणाले, की ध्रुवाचे उदाहरण पाहा. तो नारद वचनांवर विश्वास ठेवून प्रेमाने नामस्मरण करू लागला. तो इतर विचारांच्या, शंका-कुशंकांच्या नादी लागलाच नाही. ‘एक तत्त्व नाम’ हेच त्याने धरले, म्हणून त्याला नारायण प्रसन्न झाला. सद्‍गुरू नि:स्वार्थी असतात. ते तळमळीने सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवावी आणि अखंड नामस्मरण करीत राहावे. (latest marathi news)

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : जनतेला दुःखमुक्त करणे हे सेवामार्गाचे सामाजिक व्रत : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

नामस्मरण सोडावेसे वाटत नाही, तोपर्यंत ते घेतच राहावे. नामस्मरणात रंगून जाईपर्यंत ते घ्यायचे असते. नामस्मरणात रंगल्यावर ते सुटत नाही. ‘श्री स्वामी समर्थ’ हेच नाव श्रेष्ठ आहे. चरित्र विसरले तरी चालेल; पण नामस्मरण विसरू नये, कारण नामस्मरणात सर्व चरित्र साठविलेले आहे. ज्ञान, कर्म, उपासना यापेक्षा नामस्मरण हे सोपे साधन आहे.

एक मोठा अभेद्य किल्ला होता. मुंगीलाही आत प्रवेश करणे अशक्य असा तट किल्ल्याला होता; पण किल्ल्याच्या मोठ्या दरवाजाला एक मोठे कुलूप होते. एकाला त्याची किल्ली मिळाली, मग प्रवेश सुलभ झाला. तसे नामस्मरण ही किल्ली आहे. परमार्थ कितीही कठीण असला, तरी नामस्मरणाने सुसाध्य होते, असे गुरुमाउली म्हणाले.

सुरवातीला गुरुमाउलींच्या आगमनानंतर सेवेकऱ्यांनी जयघोष केला. राज्यभरातून आलेल्या काही सेवेकऱ्यांचे गुरुमाउलींच्या हस्ते प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. मार्गदर्शनानंतर शंका निरसन करण्यात आले. महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे यांची उपस्थिती होती.

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More : भवरोगावरील औषधाच्या 3 मात्रा : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com