'इथल्या' आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया सुरू...तब्बल इतकी पदे रिक्त

doctor image.jpg
doctor image.jpg

नाशिक : कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावात रुग्णांवर उपचार करतेवेळी आरोग्य यंत्रणेचे पितळ राज्यभर उघडे पडले. लोकसंख्या व असलेली यंत्रणा याचा ताळमेळ वर्षानुवर्षे न लागणारा कसा आहे. याची लक्तरेच या संसर्गाने बाहेर आणलीत. एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे आरोग्य विभागाकडे पुरेशा व प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी अडचणी आल्याने अखेर आरोग्य विभागाला विशेषज्ञांसह अत्यावश्‍यक असलेली पदे त्वरित भरण्याचा निर्णय घ्यावा लागला.

वेतनवाढीमुळे तज्ज्ञ मिळण्याची आशा; भरती प्रक्रियेला वेग 

अपुरे वेतन आणि सोयीसुविधांमुळे शासकीय आरोग्यसेवेकडे येण्यास डॉक्‍टर्स अनुत्सुक असतात. आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडल्याने नवीन भरती प्रक्रियेमध्ये शासनाने डॉक्‍टरांच्या वेतनात वाढीचा निर्णय घेतला. आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्यात रिक्त असलेल्या सुपरस्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, एमबीबीएस, बीएएमएस या पदांवरील डॉक्‍टरांची भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार नाशिक विभागांतर्गत नाशिकसह नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नगर या जिल्ह्यांतही 156 जागा रिक्त आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक विभागात नेफरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, नवजातबालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन, नेत्ररोग या सुपरस्पेशालिस्ट-स्पेशालिस्ट डॉक्‍टरांसह, एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, लसीकरण फील्ड मॉनिटर, सुविधा व्यवस्थापक, समुपदेशक, फार्मासिस्ट, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर, प्रोग्राम असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, डायलिसिस टेक (आयपीएचएस), दंततंत्र अशा 156 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे 156 पैकी 120 जागा या विशेषज्ञांच्या रिक्त आहेत. ही प्रक्रिया सध्या असून, यात नाशिक विभागात तब्बल 120 विशेषज्ञांची पदे रिक्त असल्याचे समोर आहे. 

स्पेशालिस्ट नसल्याने रुग्णांची हेळसांड 
उत्तर महाराष्ट्र विभागासाठी संदर्भ सेवा सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे. विभागात जिल्हा रुग्णालयांमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा आहे. असे असले तरी सुपरस्पेशालिस्ट दर्जाचे तज्ज्ञ डॉक्‍टर्स विभागातील आरोग्य संस्थांमध्ये नाहीत. असे असले तरी एमडी दर्जाचे स्पेशालिस्ट डॉक्‍टरांचीही वानवा आहे. बहुतांश ठिकाणी अद्यापही स्त्रीरोग आणि बालरोगतज्ज्ञांची कमतरता आहे. तर उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये एमबीबीएस डॉक्‍टरांना स्पेशालिस्ट डॉक्‍टरांची भूमिका पार पाडावी लागते. त्यामुळे रुग्णांची हेळसांड वा त्यांच्या जिवावर बेतण्याच्या घटना सतत घडतात. 

विभागातील डॉक्‍टरांची स्थिती 
सुपरस्पेशालिस्ट/स्पेशालिस्ट/एमबीबीएस 
जिल्हा मंजूर पदे भरलेली पदे रिक्त 
नाशिक 496 470 26 
धुळे 155 122 33 
जळगाव 309 306 03 
नगर 352 328 24 
नंदुरबार 382 369 13 

बीएएमएस 
नाशिक 90 87 03 
धुळे 34 31 04 
जळगाव 29 21 08 
नगर 26 26 00 
नंदुरबार 83 87 04 
एकूण 1756 1637 119 


विभागातील रिक्त पदे व वेतन 
पद रिक्त पद वेतन 
* सुपरस्पेशालिस्ट डॉक्‍टर 05 1.25 लाख रुपये 
* स्पेशालिस्ट डॉक्‍टर 31 75 हजार रुपये 
* एमबीबीएस 38 60 हजार रुपये 
* बीएएमएस/बीएचएमएस 46 28 हजार रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com