नाशिक : सकस आहार पुरविण्याचे काम बचतगटांकडेच

निविदा सूचना प्रसिद्ध; कोरोनाकाळात कच्चा आहार
Nashik healthy diet To supply Work Bachat gat side
Nashik healthy diet To supply Work Bachat gat side sakal

नाशिक : महापालिकेने (Nashik Municipal Corporation) निविदा सूचना प्रसिद्ध केल्याने बचतगटांना सकस आहार पुरविण्याचे काम मिळेल की नाही, याबाबत असलेली संदिग्धता संपुष्टात आली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या ऐच्छिक कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी बालकांना तीन वर्षांसाठी पोषण आहारपुरवठा करण्यासंदर्भात महिला मंडळ, संस्था व महिला बचतगटांकडून विभागनिहाय अर्ज मागविले आहेत.

Nashik healthy diet To supply Work Bachat gat side
उत्तराखंडमध्ये भाजपला डबल दणका; मंत्र्यासह आमदाराचा राजीनामा?

महापालिकेने शासन निर्देशानुसार, अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार पुरविण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. त्यात सेंट्रल किचनअंतर्गत मोठ्या ठेकेदारांनी सहभाग घेताना रिंग केल्याने महिला बचतगटांना काम मिळत नव्हते. महिला बचतगटांना काम मिळावे, अशी मागणी शिवसेनेने केली होती. मात्र प्रशासनाकडून दाद मिळत नव्हती. वार्षिक आर्थिक उलाढालीच्या जाचक अटींमुळे अडचणी निर्माण होत होत्या. अट शिथिल केल्यानंतर महिला बचतगटांना निविदांमध्ये सहभाग घेता येणार आहे. १ जानेवारीपर्यंत बचतगटांना अर्ज करता येणार आहेत.

Nashik healthy diet To supply Work Bachat gat side
मुक्काम पोस्ट थत्तेकड

बालकांना गरम, ताजा आहार

बालकांना दिल्या जाणाऱ्या आहारात गरम ताजा आहार, फळे व शेंगदाणे, राजगिरा लाडू, केळी, मटकी, मोडाची उसळ, गव्हाची लापसी असा प्रत्येक बालक ५० ते १०० ग्रॅम आहार पुरवठा करायचा आहे. प्रतिदिन प्रतिलाभार्थी सहा रुपये दराने आहार पुरवावा लागणार आहे. कोरोनामुळे अंगणावाड्या बंद असल्यास कच्च्या धान्याच्या स्वरूपात पूरक पोषण आहार पुरवठा केला जाणार आहे. गहू, तांदूळ, मूग किंवा मसूरडाळ, चना किंवा चवळी, साखर, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ या वस्तूंचा कच्च्या स्वरूपात पुरवठा करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com