Nashik News : शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू; ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात

Nashik News : शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
fish deaths in lake   caused by chemical waste (file photo)
fish deaths in lake caused by chemical waste (file photo)esakal

सातपूर : शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात गेल्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार संदीप गुंबाडे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, याबाबत महापालिका व पर्यावरण विभागाकडे तक्रार करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केला जात आहे. (Hundreds of fish died in Shivaji Nagar lake)

पर्यावरण राखण्यासाठी शिवाजीनगर येथील फाशीच्या डोंगरालगत पर्यावरण संस्था व नगरसेवक दिनकर पाटील यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, तर दुसरीकडे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणाबरोबर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

वीस वर्षांपूर्वी ड्रेनेज लाइन टाकली होती. पण वीस वर्षांनंतर या भागात लोकवस्ती वाढ झाली़ पण ड्रेनेज लाइन मात्र तीच आहे. ड्रेनेजचे पाणी वाहून नेणारी लाइन मात्र कमी पडत आहे. त्यामुळे ड्रेनेज फुटण्याचेही प्रमाण वाढले आहे. (Latest Marathi News)

fish deaths in lake   caused by chemical waste (file photo)
Nashik Water Scarcity : जिल्ह्यात 785 गाव-वाड्यांना 260 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेज लाइन फुटल्याने पाणी थेट शिवाजीनगर येथील तलावात मिसळल्याने तलावातील पाणी प्रदूषित होऊन शेकडो माशांसह अन्य जलजीव मृत्यू पडल्याची घटना समोर आली आहे.

शेकडो मासे कशामुळे मृत पावले, यांची चौकशी करण्याची मागणी मच्छीमारी करणारे नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

fish deaths in lake   caused by chemical waste (file photo)
Nashik Manohar Karda Case : अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर 'हजर'! कारडा आत्महत्या प्रकरणी भारती कारडा यांचा जबाब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com