Akshaya Tritiya 2024 : आंध्र, कर्नाटकातून 50 ट्रक आंबे येणार; कसमादेत अक्षयतृतीयेसाठी व्यापाऱ्यांचे नियोजन

Nashik News : अक्षयतृतीयेचा सण अवघ्या चार दिवसावर आला असून त्यासाठी व्यापारी वर्ग सज्ज झाला आहे. अक्षयतृतीया हा पितरांचा सण आहे.
Mango
Mango esakal

मालेगाव : अक्षयतृतीयेचा सण अवघ्या चार दिवसावर आला असून त्यासाठी व्यापारी वर्ग सज्ज झाला आहे. अक्षयतृतीया हा पितरांचा सण आहे. खानदेशात सणासाठी आमरस व पुरणपोळी केली जाते. या पार्श्वभूमीवर घाऊक व्यापाऱ्यांनी शहरासह कसमादेत किमान ५० ट्रक पेक्षा जास्त आंब्याचे नियोजन केले आहे. (Mango Season)

कर्नाटक, आंध्रप्रदेश व गुजरातमधून आंबा घेऊन येणारी वाहने या भागात पोहोचू लागली आहेत. दुष्काळी परिस्थिती व महागाई असली तरी येत्या काही दिवसात फळांचा राजा सामान्यांच्या घरात पोहोचणार आहे. किरकोळ विक्रेत्यांनीही आंबा विक्रीचे नियोजन केले आहे. अक्षयतृतीयेला आंबा विक्रीतून पाच कोटीपेक्षा अधिक उलाढाल होणार आहे.

खानदेशात अक्षयतृतीयेच्या सणाला मोठे महत्व आहे. बदलत्या काळात काही पारंपारिक रुढी, परंपरा मागे पडत असल्या तरी ग्रामीण भागात मात्र काही प्रमाणात का होईना सण पूर्वीसारखाच साजरा केला जातो. शहरी भागात अक्षयतृतीया हा केवळ पितरांपुरताच सण राहिला आहे. अक्षयतृतीयेला आमरस व पुरणपोळीचा पितरांना घास टाकला जातो.

आजही हजारो कुटुंबीय अक्षयतृतीयेपर्यंत आंबा खात नाहीत. दोन महिन्यापासून बाजारात आंबे विक्रीस येत आहेत. सध्या आंब्याचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. अक्षयतृतीयेला घराघरात आमरस केला जातो. या पार्श्र्वभूमीवर आंब्यांची मोठी आवक होते. सणापासूनच सामान्यांच्या घरात फळांचा राजा दाखल होता. घाऊक व्यापाऱ्यांबरोबरच किरकोळ व्यापारीही सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात आंबे विक्री करतात. (Latest Marathi News)

Mango
Nashik NMC News : मनपाची ऑनलाइन सेवा विस्कळित! 8 तासानंतरही सर्व्हर डाऊन

हापूसचा भाव तीनशेपर्यत

कसमादे भागातील गावठी आंबे येण्यास अजून उशिर आहे. या भागात काही शेतकऱ्यांनी आंबा लागवड केली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने आंबा लागवडीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. अक्षयतृतीयेसाठी परराज्यातून येणाऱ्या आंब्यावरच विसंबून रहावे लागते.

घाऊक व्यावसायिकांनी कर्नाटक व आंध्रप्रदेशमधून लालबाग व बदाम या जातींचा आंबा मागविला आहे. केशर गुजरातमधून येत आहे. कोकणातून प्रामुख्याने हाफूस आंबा येत आहे. हापूसचे भाव अडीचशे ते तीनशे रुपये किलो दरम्यान असल्याने त्याला मोजकेच ग्राहक आहेत. सामान्य व मध्यमवर्गीय नागरीक बदाम, लालबाग या आंब्यांनाच पसंती देतात.

आठवड्यापूर्वीच बुकींग

अक्षयतृतीयेसाठी आंबा साठवणूक सुरु करण्यासाठी घाऊक व्यावसायिकांनी येथे मोठ्या गोदामांची व्यवस्था केली आहे. शहरात २० ते २५ मोठी गोदामे आहेत. सणाच्या पाश्‍र्वभूमीवर व्यावसायिकांनी आठवड्यापुर्वीच आंब्यांचे बुकींग केले. कर्नाटक व आंध्रमध्ये लालबाग व बदाम ३५ ते ५० रुपये किलोने घाऊक भावात आंबा घेतला जातो.

Mango
Nashik Onion News : पिंपळगाल, मालेगाव, नामपूरसह सर्वत्र आवक वाढली; निवडक कांद्याला दोन हजार ते तेवीसशेचा दर

वाहतूक व इतर खर्च लक्षात घेता घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना ६० ते ७० रुपये किलोने विकतात. किरकोळ बाजारात आंब्यांचा भाव ८० ते १०० रुपये किलो दरम्यान राहण्याची शक्यता आहे. गुजरातमधून येणारा केशर यावर्षी महाग आहे.

घाऊक बाजारातच केशरने शंभरी गाठली आहे. किरकोळ बाजारात दीडशे रुपयापेक्षा अधिक भाव आहे. परराज्यातून येणार आंब्यांची वाहने येथे पोहोचू लागली आहेत. शुक्रवारी (ता.१०) अक्षयतृतीयेचा सण आहे. बुधवारपासून (ता. ८) फळांचा राजा मोठ्या संख्येने बाजारात दाखल होईल.

"अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर आठवड्यापूर्वी लालबाग व बदाम आंब्यांची बुकींग केली होती. दोन दिवसापुर्वी निघालेली वाहने येथे पोहोचली आहेत. १२ व २० टन क्षमतेच्या ट्रकमधून आंबे आणले जातात. दोन दिवसात गोदामातून किरकोळ व्यावसायिकांना मालाचे वाटप केले जाईल. सणामुळे फळ बाजारातील उलाढालीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. बाजारात लालबाग, बदाम यांची आवक सर्वाधिक असेल. त्या पाठोपाठ केशर व हाफूस विक्रीसाठी येणार आहे."

- आर. एस. बागवान, फळांचे घाऊक व्यावसायिक, चांदवड.

Mango
Nashik News : पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रासह अन्य राज्यांवर अन्याय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com