Nashik ZP News: टॅंकरच्या पाणी स्त्रोतांचीही तपासणी! जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

Nashik News : जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर टॅंकरचा पाणीपुरवठा शुद्ध व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य व स्वच्छता-पाणीपुरवठा विभाग सरसावला आहे.
water tanker
water tankeresakal

Nashik ZP News : जिल्ह्यातील टंचाईच्या पार्श्वभूमीवर टॅंकरचा पाणीपुरवठा शुद्ध व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य व स्वच्छता-पाणीपुरवठा विभाग सरसावला आहे. ज्या ठिकाणी टॅंकर भरला जातो, त्या पाणीस्त्रोतांची तसेच गावात टॅंकर दाखल झाल्यानंतर टॅंकरच्या पाण्याची तपासणी करण्याचा निर्णय या विभागांनी घेतला आहे.

त्यानुसार नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरणालगत टॅंकर भरत असलेल्या पाणी शुद्धीकरणाची प्रत्यक्ष रेसिड्युल क्लोरिन चाचणी करण्यात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित कर्मचाऱ्यांना या वेळी प्रशिक्षणही देण्यात आले. (Nashik Inspection of water sources of tankers too ZP Water Supply Department)

जिल्ह्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा वाढत आहे. टँकरने पाणीपुरवठा करताना तो शुद्ध असावा, यासाठी टॅंकरच्या पाणीस्त्रोतांची तपासणी आरोग्य आणि स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने सुरू केली. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक टॅंकर नांदगाव तालुक्यात सुरू असल्याने येथील टॅंकरच्या पाण्याची तपासणी करण्यात आली.

तालुक्यातील बहुतांश टॅंकर माणिकपुंज धरणावरून भरले जातात. त्यामुळे जिल्हा साथरोग पर्यवेक्षक सुरेश जाधव, जिल्हा पाणी गुणवत्ता निरीक्षक किशोर शिरसाळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांनी टँकर भरत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्रोताला माणिकपुंज धरणाला भेट दिली.

तेथे भरत असलेल्या टॅंकरच्या पाण्याची तपासणी करत पाणी शुद्धीकरणाची प्रत्यक्ष रेसिड्युल क्लोरिन चाचणी केली. शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, यासाठी क्लोरिन मिक्स करण्याच्या सूचना केल्या. टँकरचालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

एकही पिण्याचा पाण्याचा टँकर शुद्धीकरण न करता ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणार नाही, याबाबत सर्व ग्रामसेवक व आरोग्य यंत्रणेला गटविकास अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. खासगी पाणीपुरवठा व्यवसाय करणारे आरो प्लांटधारकांचे पाणी नमुने तपासणी करण्याचे निर्देश दिले. येथील ग्रामसेवक, आरोग्यसेवक, जलसुरक्षारक्षक यांची बैठक घेत त्यांना मार्गदर्शन केले.

(latest marathi news)

water tanker
Nashik ZP News : जि. प. चा 16.50 कोटी सेस ‘जलसंपदा’ने परस्पर केला वळता

शुद्ध पाण्यासाठी केल्या सूचना

ज्या स्त्रोतावरून टँकर पाणी भरत असेल, तिथे जागेवरच ओटी टेस्ट घ्यावी, नजीकच्या ठिकाणी हवाबंद खोलीत घट्ट झाकण असलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यात ब्लिचिंग पावडरचा साठा करून ठेवावा, स्त्रोताचे पाणी वापरण्यापूर्वी त्याची जैविक व रासायनिक तपासणी करावी, तसेच ब्लिचिंग पावडरचा नमुना जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतून तपासणी करून त्याचा अहवाल नियमित प्राप्त करून घ्यावा,

स्त्रोताचे पाणी दैनंदिन अहवालात त्यांच्या स्वाक्षरीसह नोंद करावी, पाणी तपासणी करताना वाहनाचा नंबर व वाहन चालकाचा नंबर याबाबत माहिती अद्ययावात करून ठेवावी, प्रतिबंधित केलेल्या स्त्रोतांवर पिण्याचे पाणी भरू नये, असे स्त्रोत असल्यास त्यासमोर प्रतिबंधित असल्याचा फलक लावावा. कार्यक्षेत्रात दवंडी देऊन याबाबत जनजागृती करावी, अशा सूचना करण्यात आल्या.

water tanker
Nashik ZP News : जि. प. चे 150 कोटींचे धनादेश अडकले; 30 कोटी वेळेत जमा न करणे पडले महागात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com