‘आरटीई’ प्रवेशात राज्‍यात नाशिकची आघाडी

rte
rteesakal

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत (RTE) गरजू, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के राखीव जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सुरू असलेल्‍या या प्रक्रियेंतर्गत ३० जूनपर्यंत प्रवेश निश्‍चितीची मुदत आहे. सद्यःस्‍थितीत राज्‍यात प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्‍याचे चित्र आहे. राज्‍यात अवघ्या ४४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले असल्‍याची आकडेवारी संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. हे सर्व ४४ विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील आहेत. राज्‍यपातळीवर ७७८ विद्यार्थ्यांचे तात्‍पुरते प्रवेश झाले आहेत. (Nashik is leading in RTE admission process in the state)

आरटीई प्रवेशप्रक्रिया कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे मंदावली होती. नोंदणीप्रक्रिया राबविल्‍यानंतर सोडतही जाहीर केली होती. त्‍यातच कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना प्रक्रिया पुन्‍हा ठप्प झाली होती. नुकतीच प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे. सोडतीत नावे जाहीर झालेल्‍या विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेशासाठी मुदत असणार आहे. यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाईल.

rte
मुलीच्या तिरंदाजी प्रशिक्षणासाठी वडीलांनी विकली शेती!

राज्‍यात प्रक्रिया संथगतीनेच

राज्‍यातील नऊ हजार ४३२ शाळांमध्ये ९६ हजार ६८४ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध आहेत. त्‍यासाठी दोन लाख २२ हजार ५८४ अर्ज प्राप्त झाले आहेत. ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांच्‍या नावाची घोषणा सोडतीत केली आहे. यापैकी ७७८ जागांवर तात्‍पुरते प्रवेश झाले असून, ४४ प्रवेश निश्‍चित झाले आहेत. एकूणच प्रवेश निश्‍चितीची प्रक्रिया सध्यातरी संथ गतीने सुरू आहे.

सोडतीत चार हजार विद्यार्थ्यांचा समावेश

नाशिक जिल्ह्यात साडेचारशे शाळांतील चार हजार ५४४ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी १३ हजार ३३० अर्ज प्राप्त झाले होते. सोडतीत चार हजार २०८ विद्यार्थ्यांच्‍या नावांचा यादीत समावेश होता. यापैकी ४४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, तीन विद्यार्थ्यांचे तत्‍पुरते प्रवेश झाले आहेत.

(Nashik is leading in RTE admission process in the state)

rte
मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असं कुठं म्हटलं?- संजय राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com