Jal Jeevan Mission : जिल्ह्यात 821 कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; ‘जलजीवन’च्या कामांची मुख्य अभियंत्यांकडून पाहणी

Jal Jeevan Mission : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू असून, ३१ मार्च अखेर ८२१ कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विभागाने निश्चित केले आहे.
Manisha Palande, Chief Engineer of Water Supply and Sanitation Department while inspecting the works of Jaljeevan Mission Yojana in the taluka. Neighboring Executive Engineer Sandeep Sonwane, Taluka Deputy Engineer, officers and staff.
Manisha Palande, Chief Engineer of Water Supply and Sanitation Department while inspecting the works of Jaljeevan Mission Yojana in the taluka. Neighboring Executive Engineer Sandeep Sonwane, Taluka Deputy Engineer, officers and staff.esakal

Jal Jeevan Mission : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेची कामे पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू असून, ३१ मार्च अखेर ८२१ कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विभागाने निश्चित केले आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या कामांची मंत्रालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मुख्य अभियंता तथा विशेष कार्यकारी अधिकारी मनीषा पलांडे यांनी पाहणी करत आढावा घेतला. (nashik Jal Jeevan Mission marathi news)

इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे, आडसरे बुद्रुक, भरवीर खुर्द, घोटी खुर्द, पिंपळगाव मोर, कावडदरा या सहा जलजीवन योजनेच्या कामांची मनीषा पलांडे यांनी ‘ऑन दि‌ स्पॉट’ पाहणी केली. योजनेचे अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश याची माहिती घेत केलेल्या कामांची पडताळणी त्यांनी या वेळी केली.

वाडीवऱ्हे योजनेचे काम पूर्ण झाल्याचे तर उर्वरित कामे प्रगतिपथावर असल्याचे आढळले. त्यांनी विविध सरपंचांसह ग्रामस्थांशी कामाच्या गुणवत्ता व दर्जाबाबत संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी पाण्याचे उद्‌भवस्थळ, टाक्या, वितरण व्यवस्था, जलशुद्धीकरण केंद्रांची पाहणी केली. जिल्ह्यात एक हजार २२२ योजना मंजूर असून एक हजार २२१ योजनांची कामे सुरू आहेत. (latest marathi news)

Manisha Palande, Chief Engineer of Water Supply and Sanitation Department while inspecting the works of Jaljeevan Mission Yojana in the taluka. Neighboring Executive Engineer Sandeep Sonwane, Taluka Deputy Engineer, officers and staff.
Jal Jeevan Mission : विलंब लावणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई; ‘सीईओ’ शुभम गुप्ता यांचा इशारा

यात ३१ मार्च अखेरपर्यंत ८२१ कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आत्तापर्यंत ३६० कामे १०० टक्के पूर्ण झाले आहे. २५० कामे ९० ते ९५ टक्के पूर्ण झाली आहेत. सप्टेंबरअखेर सर्व उद्दिष्ट साध्य होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी त्यांना दिली. ‘जलजीवन’ची कामे पूर्ण करण्यासाठी दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे.

कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना मुदतवाढ देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील इतर जिल्हा परिषदांच्या तुलनेत नाशिकची कामे प्रगतिपथावर असल्याने मुख्य अभियंता पलाडे यांनी समाधान व्यक्त करत उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

Manisha Palande, Chief Engineer of Water Supply and Sanitation Department while inspecting the works of Jaljeevan Mission Yojana in the taluka. Neighboring Executive Engineer Sandeep Sonwane, Taluka Deputy Engineer, officers and staff.
Jal Jeevan Mission : जिल्ह्यात जलजीवनच्या 90 विहिरी चाचणीत फेल; सर्वाधिक 66 विहिरींचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com