Jal Samruddh Nashik : जिल्ह्यात 191 तलाव ‘गाळमुक्त’ होणार! जिल्हाभर आजपासून ‘जलसमृध्द नाशिक’ अभियान

Nashik News : पाण्याअभावी कोरडे पडत असलेले धरण व पाझर तलावांतून गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘जलसमृध्द नाशिक’ मोहीम हाती घेतली आहे.
Silt remove From ponds
Silt remove From ponds esakal

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Jal Samruddh Nashik : पाण्याअभावी कोरडे पडत असलेले धरण व पाझर तलावांतून गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘जलसमृध्द नाशिक’ मोहीम हाती घेतली आहे. पंधरा तालुक्यांमधील १९१ पाझर तलावांमध्ये साठलेला साडेसात लाख घनमीटर गाळ काढण्यासाठी प्रशासनाला तीन कोटी ३७ लाख रुपयांची आवश्‍यकता भासणार आहे. दोन महिन्यांच्या कामासाठी सामाजिक संस्थांकडून एवढा निधी उभारायचा कसा असा प्रश्‍न आता प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. (Nashik 191 lakes in district will silt free news)

धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढवण्यासाठी १६ एप्रिल ते १५ जून या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ‘जलसमृध्द नाशिक’ अभियान राबवण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ मंगळवारी (ता.१६) गंगावऱ्हे येथून म्हणजेच गंगापूर धरणापासून होत आहे. गंगापूर धरण गाळमुक्त करून शंभर लाख लिटरने त्याची क्षमता वाढवण्याचा संकल्प मृद व जलसंधारण विभागाने केला आहे.

या अभियानात जिल्हाधिकारी, महापालिका, जिल्हा परिषद या विभागांबरोबर शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजक व सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला आहे. धरणातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जाणार आहे. गाळ काढण्यासाठी जेसीबी मशिन्स वापरण्यात येतील.

शेतकऱ्यांना फक्त गाळ वाहून न्यायचा आहे. त्यासाठी प्रशासन पूर्णत: सहकार्य करणार आहे. फक्त गंगापूर धरणच नव्हे तर जिल्ह्यातील मध्यम, लघु धरणांसह पाझर तलावांमधील गाळही काढण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील पाझर तलाव व बंधाऱ्यांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे.

तलावात नेमका किती गाळ साठला आहे, गाळ काढण्यासाठी अपेक्षित खर्च दिला आहे. जिल्ह्यातील १९१ तलावांमधील गाळ काढण्यासाठी अपेक्षित तीन कोटी ३७ लाख रुपये उभे करण्यासाठी प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. (latest marathi news)

Silt remove From ponds
Nashik Water Crisis : गंगापूर धरणाची जलपातळी 605 मीटरपर्यंत खालावली! पाणी संकट गडद

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार

राज्यात मे २०१७ ते मार्च २०२१ पर्यंत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. राज्याच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत ही योजना राबवली जाते. अल्पभूधारक, विधवा, दिव्यांग व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले.

अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि इंधन याकरिता ३१ रुपये प्रती घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी ३५.७५ रुपये प्रती घनमीटरप्रमाणे एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत व अडीच एकरला (हेक्टरी) ३७ हजार ५०० रुपये अनुदान मिळत होते. याअनुदानाविषयी जिल्हा प्रशासनाने अद्याप कुठलीही घोषणा केलेली नाही.

अर्धशतकी धरणांचे सर्वेक्षण आवश्‍यक

जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, चणकापूर, ओझरखेड, पालखेड, वाघाड अशा पन्नास वर्षांपूर्वी बांधलेल्या धरणांमध्ये १५ ते २० टक्के गाळ साठला आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या धरणांचे सर्वेक्षण करून गाळाची परिस्थिती जाणून घ्यायला हवी, असे मत जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केली. धरणांमध्ये येणारे पाणी कुठल्या भागातून येते त्यावरुन गाळाचे प्रमाण निश्‍चित होते.

तालुकानिहाय गोषवारा

तालुका.........पाझर तलाव.......गाळ (सघमी).......रक्कम

पेठ...............१०.........................३३८००...........१५ लाख ७ हजार

दिंडोरी.........२२..........................८१५८५..........३६ लाख ३८ हजार

सुरगाणा.....९...........................३७०००...........१६ लाख ५० हजार

कळवण......१३........................४१७००............१८ लाख ५९ हजार

सिन्नर.........१५....................४९९५०..............२२ लाख २७ हजार

येवला...........१६....................५१६००.............२३ लाख एक हजार

चांदवड..........९.....................३३०००.............१४ लाख ७१ हजार

निफाड..........२०..................४८५००.............२१ लाख ६३ हजार

नांदगाव.........११.................८००००............३५ लाख ६८ हजार

मालेगाव.........९...................६३०००..........२८ लाख ९ हजार

इगतपुरी........८....................३१५००..........१४ लाख चार हजार

त्र्यंबकेश्‍वर....८.....................३६०००..........१६ लाख पाच हजार

बागलाण.......२३............१००७००..............४४ लाख ९१ हजार

नाशिक.........५..............१५२००................६ लाख ७७ हजार

देवळा..........१३..............४८०००................२३ लाख १९ हजार

एकूण.........१९१.............७५१५३५......३ कोटी ३६ लाख ९६ हजार

Silt remove From ponds
Nashik ZP Staff Transfers : निवडणूक निकालानंतर जिल्हा परिषद कर्मचारी बदल्या! सामान्य प्रशासन विभागाकडून तयारी सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com