Sugarcane Juice : उन्हाळ्याची चाहूल लागताच रसवंतीगृहांमध्ये घुमतोय घुंगरांचा आवाज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Juice vendor

Sugarcane Juice : उन्हाळ्याची चाहूल लागताच रसवंतीगृहांमध्ये घुमतोय घुंगरांचा आवाज!

झोडगे (जि. नाशिक) : फेब्रुवारी महिन्याच्या मध्यांमध्येच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यामुळे तालुक्यातून गेलेल्या महामार्गालगत ठिकठिकाणी रसवंतीगृह सुरु करण्यात आले आहे. यावेळी रस्त्यांवरून जाणाऱ्या प्रवाशांना रसवंती गृहामधील घुंगुरुंचा आवाज आपोआप स्वत:कडे खेचत आहे.

उसाचा ताजा व थंडगार रस पिण्यासाठी प्रवाशांचे पाऊले रसवंतीगृहाकडे वळू लागले आहे. त्यामुळे रसवंतीगृह व्यवसायिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. (summer comes sound of bells ringing in Sugarcane Juice vendors Nashik News)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या झोडगे गावातील चौथ्या पिढीतील रसवंतीगृह चालक महेंद्र देसले आपल्या पंजोबानी सुरू केलेला रसवंतीगृह व्यवसाय आजही करतात. स्वातंत्रपूर्व काळातील सुरू झालेली बैलांच्या साह्याने उसाची रसवंती गेल्या चार पिढ्यांपासून आजही ग्राहकांना थंड व चवदार उसाच्या रस ग्राहकांना देत आहे.

माळमाथा सारख्या अवर्षणग्रस्त भागात स्वातंत्र्य पूर्व काळात स्व. दादाजी दगडू देसले यांनी खरीप हंगामातील पावसाचा भरोसावरील शेती व्यवसाय करून उदरनिर्वाहासाठी बैलांच्या साह्याने ऊसाचा रस काढण्याची घाणी सुरू केली. त्यानंतर त्यांच्या चौथ्या पिढीतील महेंद्र हे रसवंतीगृहाचा व्यवसाय सांभाळून आहेत.

उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्राहक नैसर्गिक थंड पेय पिऊन तृप्त होत आहे. नैसर्गिक रित्या उसाचा रसाला मोठी पसंती दिसून येते. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुण हंगामी व्यवसाय म्हणून शीतपेय विक्रीतून आपला उदरनिर्वाह करतात.