Nashik Manohar Karda Case : धमक्यांमुळे मनोहर कारडा यांनी उचलले टोकाचे पाऊल; कारडा यांच्या पत्नीचा दावा

Naresh Karda Case :राजकीय नेत्यांच्या धमक्यांना व छळवणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा त्यांची पत्नी भारती कारडा यांनी केला आहे.
Manohar Karda
Manohar Kardaesakal

Nashik Naresh Karda Case : कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोहर कारडा यांनी बांधकाम व्यावसायिक, प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणारे व खासगी सावकारी करणारे, तसेच काही राजकीय नेत्यांच्या धमक्यांना व छळवणुकीला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा त्यांची पत्नी भारती कारडा यांनी केला आहे. तसा अर्ज नाशिक रोड, उपनगर पोलिसांना देण्यात आला आहे. (nashik Extreme step taken by Manohar Karda due to threat)

दरम्यान, या अर्जानुसार सखोल चौकशी केली जाणार असल्याचे परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले. कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोहर कारडा यांनी २ नोव्हेंबर २०२३ मध्ये धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली होती. त्या वेळी नरेश कारडा व संचालकांविरोधात उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. नरेश कारडा यांना ३० ऑक्टोबरला अटक केली होती.

त्यानंतर २ नोव्हेंबरला मनोहर कारडा यांनी आत्महत्या केली होती. दरम्यान, भारती कारडा यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जानुसार, त्यांना घराची साफसफाई करीत असताना डायरी सापडली असून, त्यात १९ जणांनी त्यांच्या कन्स्ट्रक्शनमध्ये भागीदार, तर काहींनी गुंतवणूक केली होती. त्यांच्याकडून सतत पैशांसाठी तगादा करण्यात येत होता.

Manohar Karda
Karda Construction Fraud Case: बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना जामीन

तर काहींनी तुमच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये सडवू, अशा धमक्या दिल्या जात होत्या. यात शहरातील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिकांसह खासगी सावकारी करणारे व नाशिक रोड परिसरातील राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. या सर्वांच्या जाच, धमक्या आणि छळाला कंटाळून मनोहर कारडा यांनी आत्महत्या केली, असा दावा भारती कारडा यांनी केला आहे. सदरील अर्जानुसार संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी व अवैध सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

''श्रीमती कारडा यांचा अर्ज पोलिस ठाण्याला प्राप्त झालेला आहे. त्या अर्जानुसार सखोल चौकशी केली जाईल. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.''- मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन

Manohar Karda
Nashik Naresh Karda Fraud Case: बिल्डर कारडा यांच्या अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी; MPID विरोधात जिल्हा न्यायालयात धाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com