Hasyarang Ashitya Sammelan: हास्यरंग साहित्य संमेलनात उडणार हास्याचे फवारे! रामदास फुटाणे संमेलनाध्यक्ष

Nashik News : दोन दिवसीय या संमेलनाचे उद्घाटन २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
Lokesh Shevde of Kusumagraj Pratishthan giving information in a press conference about Hasirang Sahitya Samela
Lokesh Shevde of Kusumagraj Pratishthan giving information in a press conference about Hasirang Sahitya Samelaesakal

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठान व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आयोजित हास्यरंग साहित्य संमेलनाचे आयोजन २ व ३ मार्च रोजी कुसुमाग्रज स्मारक येथे केल्याची माहिती कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सदस्य व लेखक, कवी प्रकाश होळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे, अरविंद ओढेकर, ॲड. विलास लोणारी उपस्थित होते. (nashik Hasyarang Ashitya Sammelan marathi news)

दोन दिवसीय या संमेलनाचे उद्घाटन २ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. ज्येष्ठ विडंबनकार रामदास फुटाणे (पुणे) संमेलनाचे अध्यक्ष तर उद्घाटक लेखक, दिग्दर्शक सचिन गोस्वामी (मुंबई) असणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व कुसुमाग्रज स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत टकले उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवसीय कार्यक्रम असे :

शनिवार (ता.२) सायंकाळी ६.३० वाजता, कार्यक्रम : विनोदी कथाकथन, सहभाग : प्रसिद्ध कथाकार अप्पासाहेब खोत (कोल्हापूर) आणि संजय कळमकर (अहमदनगर).

रविवार (ता.३) मार्च सकाळी १०.३० वाजता, कार्यक्रम : व्यंगचित्र निर्मिती आणि अनुभूती सहभाग : प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी (मुंबई), गजू तायडे (पुणे). (Latest Marathi News)

Lokesh Shevde of Kusumagraj Pratishthan giving information in a press conference about Hasirang Sahitya Samela
Latest Marathi News Live Update: शरद पवार रायगडावर गेले हे क्रेडिट अजित पवारांचे - देवेंद्र फडणवीस

रविवार (ता.३) दुपारी १२ वाजता परिसंवाद : आजच्या साहित्यातील विनोद सहभाग : ज्येष्ठ समीक्षक डॉ. रमेश वरखेडे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे (कोल्हापूर), ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार (मुंबई).

रविवार (ता.३) सायंकाळी ५ वाजता समारोप समारंभ, सहभाग : ज्येष्ठ विडंबनकार रामदास फुटाणे, प्रसिद्ध कवयित्री, चित्रकार मीनाक्षी पाटील, लेखक, पटकथाकार अरविंद जगताप, कवयित्री सिसिलिया कार्व्हालो.

रविवार (ता.३) सायंकाळी ६.३० वाजता हास्य कविसंमेलन, सहभाग : बंडा जोशी (पुणे), इंद्रजित घुले (मंगळवेढा), अनिल दीक्षित (पुणे), नरेश महाजन (नाशिक), शरद धनगर (अमळनेर), गुंजन पाटील (छत्रपती संभाजीनगर), प्रमोद अंबडकार (नाशिक) सूत्रसंचालन अरुण म्हात्रे करणार आहेत.

Lokesh Shevde of Kusumagraj Pratishthan giving information in a press conference about Hasirang Sahitya Samela
Musheer Khan Ranji Trophy : सर्फराजचा भाऊच तो... द्विशतक ठोकत मुशीरनं मुंबईला पोहचवलं मजबूत स्थितीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com