Musheer Khan Ranji Trophy : सर्फराजचा भाऊच तो... द्विशतक ठोकत मुशीरनं मुंबईला पोहचवलं मजबूत स्थितीत

Musheer Khan Ranji Trophy : मुशीर हा सर्फराज खानचा छोटा भाऊ असून सर्फराज खान सध्या भारतीय संघाकडून इंग्लंडविरूद्धचा चौथा कसोटी सामना खेळत आहे.
Musheer Khan
Musheer Khanesakal

Musheer Khan Double Century Ranji Trophy 2024 : रणजी ट्रॉफी 2024 च्या उपांत्य पूर्व फेरीत मुंबईकडून खेळणाऱ्या 18 वर्षाच्या मुशीर खानने बडोदाविरूद्ध 203 धावांची नाबाद शतकी खेळी केली. मुशीने 357 चेंडूत 18 चौकार मारत ही खेळी केली. या खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात 384 धावा केल्या आहेत.

मुशीर हा सर्फराज खानचा छोटा भाऊ असून सर्फराज खान सध्या भारतीय संघाकडून इंग्लंडविरूद्धचा चौथा कसोटी सामना खेळत आहे. सर्फराज खान देखील आपल्या मोठ्या शतकासाठी प्रसिद्ध आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये अनेक द्विशतके ठोकली आहेत. आता मुशीरने देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.

Musheer Khan
Ind vs Eng 4th Test Day 2 Live : बशीरने भारताला दिले तीन धक्के; मदार यशस्वी अन् सर्फराजवरच

मुशीर नुकत्याच झालेल्या 19 वर्षाखालील भारतीय संघात देखील होता. त्याने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याने 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये दोन शतकी खेळी केल्या. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.

मुशीर आपल्या कारकिर्दीतील चौथाच प्रथम श्रेणी क्रिकेट सामना खेळत आहे. त्यात त्याने शतक नाही तर थेट द्विशतक ठोकले. मुंबईकडून त्याला तीन रणजी ट्रॉफी सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्यात त्याने फक्त 96 धावा केल्या होत्या. मात्र त्याने बाद फेरीत संघाचा निम्मा संघ 145 धावात गारद झाल्यानंतर त्याने डाव सावरत द्विशतकी खेळी केली.

Musheer Khan
WPL 2024 Sajeevan Sajanas : रिक्षा चालकाची मुलगी असलेली सजना पदार्पणात एक चेंडू खेळून बनली सर्वांच्या गळ्यातील ताईत

रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईचे रथी महारथी फ्लॉप ठरले. पृथ्वी शॉ 33 तर अजिंक्य रहाणे फक्त 3 धावा करून बाद झाला. मुशीरच्या द्विशतकासोबतच हार्दिक तामोरेने देखील 57 धावांची अर्धशतकी खेळी केली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com