नाशिक: भगत वस्ती, रेंज रोड, वडनेर येथे चार वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. ८) रात्री आठला घडली. आयुष किरण भगत (वय ४) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. वन विभाग व पोलिसांच्या तीन तासांच्या शोधकार्यानंतर थर्मल ड्रोन व श्वानपथकाच्या सहाय्याने त्याचा मृतदेह उसात सापडला.