

नाशिकच्या दिंडोरी इथं २१ वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. वनारवाडीतल्या पायल चव्हाण या मुलीवर शेतात काम करताना बिबट्यानं हल्ला केला. पायलला वाचवण्यासाठी तिच्या वडिलांनी धाव घेतली. पण तोपर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला होता. वनारवाडीत या घटनेमुळे शोककळा पसरली असून भीतीचं वातावरणही आहे.