निखिल रोकडे नाशिक: मनुष्य जसा काळानुरूप बदल स्वीकारतो, तसा बिबट्याने स्वतःमध्ये बदल करून घेतला आहे. त्यास पकडणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. एक प्रकारे बिबट्याची बदलती जीवनशैली ही वनविभागाची डोकेदुखी ठरत आहे. गेल्या चार महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ४ नागरिकांचा मृत्यू झाल्याने बिबट्यामधील बदल हा गंभीर विषय बनत चालला आहे.