Nashik Lok Sabha Constituency : विजय करंजकरांच्या आजच्या मेळाव्याकडे लक्ष! 4 जि. प. सदस्यांचा पाठिंब्याचा दावा

Lok Sabha Constituency : जिल्हा परिषदेचे चार सदस्य व पंचायत समितीचे सदस्य आपल्याबरोबर असल्याचे सांगत शनिवारी (ता. ४) सायंकाळी मेळावा घेऊन दिशा ठरविणार असल्याचे सांगितले.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituencyesakal

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून (ठाकरे गट) इच्छुक असलेले लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी आज अपक्ष अर्ज भरल्यावर आपल्यामागे सिन्नर व भगूर पालिका आणि देवळाली कॅन्टोन्मेंट, तसेच महापालिकेतील एकूण ३५ माजी नगरसेवक असल्याचा दावा केला. जिल्हा परिषदेचे चार सदस्य व पंचायत समितीचे सदस्य आपल्याबरोबर असल्याचे सांगत शनिवारी (ता. ४) सायंकाळी मेळावा घेऊन दिशा ठरविणार असल्याचे सांगितले. ()

महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ ऊर्फ पराग वाजे यांची उमेदवारी निश्‍चित झाल्यावर विजय करंजकर नाराज झाले. महायुतीने पुन्हा खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी दिल्याने करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना करंजकर म्हणाले, की वर्षभरापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ मी पिंजून काढला. प्रत्येक गावात पोहोचलो, त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच मिळणे अपेक्षित होते; पण पक्षाने वेगळा विचार केल्याने मलाही माझ्या कार्यकर्त्यांचा विचार करावा लागतो. (latest political news)

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : शिवसेना फुटीनंतर ठाकरेंचा दिल्लीला फोन

३५ माजी नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या चार सदस्यांचा पाठिंबा मला आहे. येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा भेटण्याची वेळ दिली; पण स्थानिक नेत्यांनी दोन्ही वेळा दिशाभूल केल्याने आपली भेटच होऊ न शकल्याचे करंजकर म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे आमच्याच पक्षाचे

उमेदवारीचा पत्ता कापल्यावर नाराज झालेले करंजकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले. त्याविषयी त्यांना विचारले असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षात असल्यापासूनचे संबंध आहेत. त्यांची भेट घेण्यात गैर काहीच नाही. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशीही संवाद होत असतो. त्यात वेगळे वाटण्यासारखे काहीच नसल्याचे सांगत त्यांनी ‘बंडखोरी’चे संकेत दिले.

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : नाशिकमध्ये 39 तर दिंडोरीत 20 उमेदवारांचे अर्ज; प्राप्त अर्जाची आज छाननी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com