Nashik Lok Sabha Constituency: मनसे करणार महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार; राज ठाकरेंच्या सुचनेवरून समन्वयकांची नियुक्ती

Lok Sabha Constituency: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती केली आहे.
Raj Thackeray
Raj Thackerayesakal

Nashik Lok Sabha Constituency : गुढीपाडवा मेळाव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतरही उत्तर महाराष्ट्रातून महायुतीच्या शिवसेना व भाजपकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने घालमेल झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यथा व्यक्त करताच स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती केली आहे. (Nashik Lok Sabha Constituency MNS will campaign for Mahayuti candidate)

त्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी अभिजीत पानसे, किशोर शिंदे व गणेश सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव व रावेरसाठी देखील समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात महायुतीमध्ये भाजप, शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी आहे. महायुतीला चौथा भिडू हा मनसेच्या रूपाने मिळाला आहे.

मनसेने लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच आपण महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात स्पष्ट केले. मनसेकडून बिनशर्त पाठिंबा जाहीर झाल्यानंतरही मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी महायुतीमधील घटक पक्षाच्या नेत्यांनी संपर्क केला नाही. त्यामुळे नाशिकमधील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची घालमेल वाढली. घालमेल स्पष्टपणे व्यक्त केली जात असताना राज ठाकरे यांनी समन्वयकांची नियुक्ती जाहीर केली. (latest marathi news)

Raj Thackeray
Lok Sabha Constituency : नाशिकच्या जागेसाठी महायुतीचे 3 पर्याय; इच्छुक, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची घालमेल सुरु

महायुतीच्या उमेदवाराला मदत

नाशिक व दिंडोरी या लोकसभा मतदारसंघासाठी अभिजीत पानसे, किशोर शिंदे व गणेश सातपुते या तिघांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार या लोकसभा मतदारसंघासाठी ॲड. जयप्रकाश बाविस्कर व नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

जळगाव व रावेर या दोन मतदार संघासाठी देखील अभिजीत पानसे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. महायुती व मनसेमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.मतदार संघात दौरा करण्याबरोबरच मनसे कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन महायुतीच्या उमेदवाराला प्रचारात मदत करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Raj Thackeray
Nashik Lok Sabha Constituency: जागा वाटप साताऱ्याचे, नाशिकमध्ये वाढल्या अपेक्षा; शिंदे सेनेचाही मुंबईत तळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com