Nashik Voter List : मतदार यादीत असे शोधा नाव!

Nashik News : मतदान केंद्र माहीत नसल्याने मनस्तापही सहन करावा लागतो. म्हणूनच मतदानापूर्वी ऑनलाइन पद्धतीने आपले नाव मतदार यादीत शोधणे अगदी सहज शक्य आहे.
Voter List (file photo)
Voter List (file photo)esakal

Nashik News : मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, आपले मतदान केंद्र नक्की कोठे आहे, याचा शोध आपण ऐन मतदानाच्या दिवशी घेतो. त्यामुळे काही वेळा अडचणींचा सामना करावा लागतो; तर अनेकदा मतदान केंद्र माहीत नसल्याने मनस्तापही सहन करावा लागतो. म्हणूनच मतदानापूर्वी ऑनलाइन पद्धतीने आपले नाव मतदार यादीत शोधणे अगदी सहज शक्य आहे. चला तर मग, शोधूया आपले नाव...

गुगलवर जाऊन

https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर क्लिक करा.

तुम्हाला तीन पर्याय दिसतील...

१) पहिल्या पर्यायात ईपीआयसी क्रमांकाद्वारे तुम्हाला नाव शोधता येईल.

२) जर तुम्हाला ईपीआयसी क्रमांक आठवत नसेल तर ‘विवरणाद्वारे शोध’ हा पर्याय निवडता येईल. ज्यात तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव द्यावे लागेल. तुमच्या वयाचा तपशील, राज्य, जिल्हा आणि विधानसभा क्षेत्र निवडल्यावर एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होईल.

३) तुम्हाला दोन्ही पर्याय जमत नसतील, तर मोबाईल क्रमांकाद्वारे तुम्हाला तुमच्या नावाचा शोध घेता येईल. मात्र, यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक मतदान ओळखपत्राशी संलग्न असणे आवश्‍यक आहे.

सर्व तपशील भरल्यावर तुम्हाला तुमचे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, कोणत्या दिवशी मतदान आहे, तसेच मतदान संबंधित अधिकाऱ्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांकही पाहायला मिळतो. (latest marathi news)

Voter List (file photo)
Nashik News : सुधाकर बडगुजरांना अंशत: दिलासा! उपायुक्तांकडून 10 दिवसांची मुदतवाढ

हे ‘ॲप’ डाउनलोड करा; १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

भारतीय निवडणूक आयोगाने ऑनलाइन संकेतस्थळाबरोबरच सक्षम ॲपही विकसित केले आहे. ज्याद्वारे मतदार आपले नाव, मतदान केंद्र आदी माहिती शोधू शकतात. Voter Helpline App मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्यात search your Name in Electoral Roll या पर्यायावर क्लिक करून त्यावर उपलब्ध होणाऱ्या चार उपपर्यायांच्या आधारे आपले नाव व मतदान केंद्र याबाबतचा तपशील मतदार शोधू शकतात.

या ॲपमध्ये मतदाराला आवश्यक तपशील नमूद करून किंवा आधीच जोडलेला मोबाईल क्रमांक नमूद करून किंवा मतदान ओळखपत्राचा १० अंकी क्रमांक नमूद करून त्याआधारे आपले नाव, मतदान केंद्र आणि अन्य तपशील उपलब्ध होऊ शकतो. त्याचप्रमाणे नवीन मतदाराच्या ओळखपत्रावर असलेला क्यूआर कोड स्कॅन करून मतदाराचा तपशील उपलब्ध करता येतो. तसेच, १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास मतदानाशी निगडित अडचणी सोडविण्यात येतील.

Voter List (file photo)
Nashik City Transport : बत्ती गुलमुळे सिग्नल यंत्रणा बंद! शहरात वाहतुक कोंडी

या संकेतस्थळावर शोधा नाव

भारत निवडणूक आयोगाचे मतदार पोर्टल https://voters.eci.gov.in/. वर मतदाराने प्रथम राज्याचे नाव, स्वत:चे पहिले नाव, वय किंवा जन्मतारीख व लिंग ही अनिवार्य माहिती नमूद केल्यावर मतदार त्याचे नाव मतदार यादीत शोधू शकतात. तसेच, मतदार ओळखपत्राच्या दहा अंकी क्रमांकाच्या आधारे किंवा मतदाराच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे (सदर मोबाईल संबंधित मतदार माहितीसाठी यापूर्वी जोडलेला असेल तर) आपले नाव, मतदान केंद्र व क्रमांक शोधण्याचा पर्याय लिंकवर उपलब्ध आहे.

मतदानासाठी भरपगारी सुटी

लोकसभा निवडणुकीत मतदारांना सोमवारी (ता. २०) मतदानासाठी भरपगारी सुटी जाहीर करण्यात आली आहे. काही कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी दिली जाणार नसेल तरी किमान मतदान होईपर्यंत कर्मचाऱ्यांना सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. एकाही व्यक्तीला मतदानापासून वंचित ठेवता येणार नाही, यादृष्टीने सर्व आस्थापनांनी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सोमवारी बहुतांश कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी मिळणार आहे. उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व उद्योगसमूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदी आस्थापनांनी नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Voter List (file photo)
Nashik Loksabha मध्ये भुजबळ फॅक्टर निवडणुकीत किती महत्वाचा ठरणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com