Dindori Lok Sabha Election : दिंडोरीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली! माकपकडून उमेदवारी अर्ज दाखल

Lok Sabha Election : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
J.P. Gavit of CPI(M) came with his supporters to file his candidature for Dindori Lok Sabha.
J.P. Gavit of CPI(M) came with his supporters to file his candidature for Dindori Lok Sabha. esakal

Dindori Lok Sabha Election : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे उमेदवारी करीत आहे. आमची उमेदवारी इंडिया आघाडीकडून आहे, आम्ही माघार घेणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवाराची माघार घ्यावी, असे माकप नेते माजी आमदार जे. पी. गावित यांनी सांगितले. (Maha Vikas Aghadi problem increased in Dindori )

गत काही दिवसांपासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. दिंडोरीची जागा आम्हाला सोडावी, अशी मागणी माकपने केली होती. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला असल्याचे सांगत, ‘राष्ट्रवादी’ने दिंडोरी लोकसभेतून भास्कर भगरे यांना उमेदवारी देत रिंगणात उतरविले. त्यानंतर नाराज झालेल्या माकपने दिंडोरीत समर्थकांची बैठक घेतली.

या बैठकीत ‘राष्ट्रवादी’ने भगरे यांची उमेदवारी बदलावी, अन्यथा त्यांना पाडणारच, असा इशारा गावित यांनी शरद पवारांना दिला होता. त्यावर, ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीने नाशिक येथे येऊन गावित यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी गावित यांची समजूत काढत विधानसभेला माकपला जागा सोडणार असल्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव गावित यांनी फेटाळून लावला.

त्यावर, प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन दिले होते. मात्र, तत्पूर्वीच माकपने जे. पी. गावित यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शुक्रवारी (ता. २६) माजी आमदार गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे दिंडोरीत महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. (Nashik Political News)

J.P. Gavit of CPI(M) came with his supporters to file his candidature for Dindori Lok Sabha.
Dindori Lok Sabha Constituency : बिगर आदिवासी मतदारच ठरवणार आदिवासी खासदार!

राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवाराची माघार घ्यावी, आम्ही किती दिवस इतरांच्या पालख्या व्हायच्या? राज्यभरात आमचे दहा लाख मतदार आहेत. ते आघाडीला मतदान करतील. दिंडोरीची जागा माकपला सोडावी, राष्ट्रवादी काँग्रेसने इतर नऊ जागांवर लक्ष द्यावे, ही जागा आम्हीच लढविणार. आता काही झाले तरी माघार घेणार नसल्याचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर गावित यांनी स्पष्ट केले.

रॅलीतून लाल वादळ पुन्हा रस्त्यावर

विविध मागण्यांसाठी दहा दिवस शहरातील रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन करणारे लाल वादळ पुन्हा नाशिकच्या रस्त्यावर दिसले. माकप उमेदवार गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माकपतर्फे गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली दाखल झाल्यावर, प्रवेशद्वाराजवळच ठिय्या मांडण्यात आला.

या वेळी सुरगाणा पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रजित गावित, ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, जनवादी महिला संघटनेच्या सरचिटणीस मरियम ढवळे, माकप प्रदेश सचिव उदय नारकर, ‘सीटू’चे उपाध्यक्ष डॉ. डी. एल कराड, सचिव मंडल सदस्य सुनील मालुसरे, जिल्हाध्यक्ष किसन गुजर सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.

J.P. Gavit of CPI(M) came with his supporters to file his candidature for Dindori Lok Sabha.
Nashik-Dindori Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीचे उमेदवार 29 ला अर्ज दाखल करणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com