Nashik Lok Sabha Election : आडनाव आधी घेतल्याने ईव्हीएममध्ये गोडसे दुसरे

Lok Sabha Election : उमेदवारांच्या नावातील पहिल्या अक्षरानुसार ‘ईव्हीएम’वरील त्यांच्या नावाची क्रमवारी निश्‍चित होत असल्याने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी नावात ऐनवेळी बदल केला आहे.
Hemant Godse
Hemant Godse esakal

Nashik News : लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या नावातील पहिल्या अक्षरानुसार ‘ईव्हीएम’वरील त्यांच्या नावाची क्रमवारी निश्‍चित होत असल्याने महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी नावात ऐनवेळी बदल केला आहे. त्यामुळे ‘ईव्हीएम’वर गोडसेंचे नाव दुसऱ्या स्थानी, तर राजाभाऊ वाजेंचे नाव तिसऱ्या स्थानी गेले आहे. (Nashik Lok Sabha Election)

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना ईव्हीएम मशिन्सवर उमेदवाराला नावाचा क्रम ठरविण्याचा अधिकार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे रीतसर अर्ज हा चिन्हवाटप होण्यापूर्वी देणे बंधनकारक आहे. या नियमाचा आधार घेत हेमंत गोडसे यांनी आपल्या नावात गोडसे हेमंत तुकाराम असा बदल सुचविला.

त्यामुळे मराठी बाराखडीनुसार गोडसेंचे नाव अरुण काळे यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी आले आहे. राजाभाऊ वाजे तिसऱ्या स्थानी गेले. गोडसे यांच्यासह आणखी तीन, चार नावांनी तशीच मागणी करून मतपत्रिकेतील आपल्या क्रमवारीत फेरबदल करवून घेतले आहेत. नाशिक मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्ष तसेच अपक्षांसह एकूण ३१ उमेदवार रिंगणात आहेत.

यातील पाचव्या क्रमांवर असलेले ॲड. आव्हाड झुंजार म्हसूजी यांनी आपले नाव ॲड. झुंजार म्हसूजी आव्हाड असे केल्याने त्यांचे नाव दहाव्या क्रमांकावर, तर उमेदवार यादीत २५ व्या क्रमांकावर असलेले प्रकाश गिरधारी कनोजे यांनी आडनाव प्रथम लावल्याने ते १६ व्या स्थानी पोहोचले. (latest marathi news)

Hemant Godse
Nashik Parking Problem : ‘नो-पार्किंग’मधील वाहनांकडे ‘कानाडोळा’! सोयीनुसार वाहनांची टोईंग; कोंडीची समस्या जैसे थे

या सर्व नावातील बदलामुळे काही उमेदवार वर-खाली गेले. यंत्रणेने उमेदवारी अर्जानुसार यादी तयार केली. बदललेल्या क्रमवारीनुसार राज्य निवडणूक आयोगाकडून मतपत्रिकेला मान्यता देण्यात आली आहे.

खर्च पाण्यात

उमेदवारांना चिन्ह मिळताच त्यांनी माहितीपत्रक छापले. त्यावर आपला अनुक्रमांकही नोंदविला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांनी सातव्या क्रमांकाचे माहितीपत्रक छापले. पण, क्रमवारीत अचानकपणे बदल झाल्याने ते सहाव्या क्रमांकावर आले आहेत. आता पुन्हा पत्रक छापण्याची वेळ त्यांच्यावर आली.

Hemant Godse
Nashik Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत नाशिकला बैठक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com