Nashik Lok Sabha Election : MIDC कार्यालयातर्फे मतदानाविषयी जनजागृती

Lok Sabha Election : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या येथील कार्यालयातर्फे जागतिक महिला दिनापासून जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Mahendra Sali, Regional Manager of the office of MIDC here, while raising public awareness in the companies to vote as much as possible in the Lok Sabha elections, B. D. Algae.
Mahendra Sali, Regional Manager of the office of MIDC here, while raising public awareness in the companies to vote as much as possible in the Lok Sabha elections, B. D. Algae.esakal

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या येथील कार्यालयातर्फे जागतिक महिला दिनापासून जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत विविध कंपन्यांमध्ये जात ‘एमआयडीसी’चे क्षेत्रीय व्यवस्थापक बी. डी. शेवाळे व महेंद्र साळी कर्मचाऱ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देत आहेत. (Nashik Lok Sabha Election Public awareness about voting marathi news)

यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांनी आपला हक्क बजवावा, असे आवाहन त्यांच्या नेतृत्वाखालील पथक करीत आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी ‘एमआयडीसी’कडून श्री. शेवाळे व श्री. साळी यांच्या पथकाद्वारे कंपन्यांमध्ये जाऊन कामगार, कर्मचाऱ्यांना निवडणुकीत मतदान करण्याचा हक्क बजावण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

उद्योजकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन निवडणूक नोडल अधिकारी तथा ‘एमआयडीसी’चे क्षेत्रीय व्यवस्थापक शेवाळे व साळी यांनी केले. दरम्यान, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांतर्फे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. (Latest Marathi News)

Mahendra Sali, Regional Manager of the office of MIDC here, while raising public awareness in the companies to vote as much as possible in the Lok Sabha elections, B. D. Algae.
Nashik Lok Sabha Election : काँग्रेसच्या मैदानात शिवसेनेचा चौकार; नाशिक लोकसभा

जिल्ह्यातील सातपूर व अंबड या औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योजक, व्यवस्थापक तसेच कामगार वर्गात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष नोडल आधिकारी म्हणून श्री. शेवाळे व श्री. साळी यांची नियुक्ती करण्यात आली. औद्योगिक वसाहतीमधील सर्वच छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये शेवाळे व साळी यांचे विशेष पथक जाऊन जनजागृती करीत आहे.

या पथकाने नुकतीच जो. टो. अॅब्रेशिव्ह व गोगटे इलेक्ट्रो, तसेच राठी उद्योग, अंबडमधील पांचाळ इंडस्ट्रीज आदी ठिकाणी जात उद्योजक, वरिष्ठ व्यवस्थापक व कामगारांना अभियानात सहभागी करीत जनजागृती करीत त्यांना मतदानाचे आवाहन केले.

Mahendra Sali, Regional Manager of the office of MIDC here, while raising public awareness in the companies to vote as much as possible in the Lok Sabha elections, B. D. Algae.
Nashik Lok Sabha Election : ‘लहरी‘ मतदारसंघात दुभंगलेल्या शिवसेनेची कसोटी; भाजप एक तर बीएलडीचाही प्रभाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com