Nashik News : जुन्या नाशिकमध्ये कृत्रिम पाणीटंचाई; मुख्य पाइपलाइनला गळती

शहरातील बुधवार पेठ आणि पिंझार घाट जलकुंभांना पाणीपुरवठा करणाऱ्या जीपीओ जलकुंभाच्या मुख्य पाइपलाइनचा व्हॉल नादुरुस्त झाला.
Form of pond in GPO Jakumbh premises due to leakage of water supply main pipeline vol.
Form of pond in GPO Jakumbh premises due to leakage of water supply main pipeline vol.esakal

Nashik News : शहरातील बुधवार पेठ आणि पिंझार घाट जलकुंभांना पाणीपुरवठा करणाऱ्या जीपीओ जलकुंभाच्या मुख्य पाइपलाइनचा व्हॉल नादुरुस्त झाला. गळती लागून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना बुधवार (ता.२०) रात्री घडली. ऐन सणासुदीच्या दिवसात या भागात पाणीपुरवठा न झाल्याने संपूर्ण जुने नाशिकसह अन्य काही भागातील नागरिकांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागले. (Nashik main pipeline leak causing artificial water shortage in old Nashik marathi news)

शहरातील जीपीओ जलकुंभातून जुने नाशिक येथील पिंझार घाट व बुधवार पेठ येथील जलकुंभांना पाणीपुरवठा केला जातो. येथूनच मुख्य पाइपलाइन असून जलकुंभ आवारात त्याच पाइपलाइनवर व्हॉल बसविण्यात आला आहे. बुधवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास पाइपलाइनवरील व्हॉल नादुरुस्त होऊन मोठ्या प्रमाणात पाणी गळतीला सुरवात झाली.

यामुळे लाखो लिटर पाणी हे रस्त्यावर वाहू लागले. या पाण्यासाठी खडकाळी, दूध बाजार, शालीमार भागातील पाणी वाहत होते. तर जीपीओ जलकुंभ आवारातही पाण्याचे तळे साचले होते. लाखो लिटर पाणी वाया गेल्याने पिंझार घाट, बुधवार पेठे या भागासह आजूबाजूच्या इतर भागांना गुरुवारी (ता.२१) पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.  (Latest Marathi News)

Form of pond in GPO Jakumbh premises due to leakage of water supply main pipeline vol.
Nashik News : महिनाभरात 502 नळजोडण्या खंडित

निकृष्ट दर्जाचे काम

काही दिवसांपूर्वीच व्हॉलचे काम पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसातच गळती झाल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. एकीकडे गंगापूर धरणात पाणीसाठा कमी झाला आहे. दुसरीकडे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराने लाखो लिटर पाणी वाया जाण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

सणासुदीत पाणीपुरवठा खंडित

गळती लागलेली पाइपलाइन जुने नाशिक परिसरात पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन होती. बुधवारी रात्री त्यावरील व्हॉल नादुरुस्त होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले. सध्या रमजान पर्व सुरू आहे. अशा वेळेस सकाळीच पाण्याची अधिक आवश्यकता भासत असते. पाणीपुरवठा होऊ शकला नसल्याने सणासुदीत त्यांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागले.

Form of pond in GPO Jakumbh premises due to leakage of water supply main pipeline vol.
Nashik News : धुळवडीमुळे इंदिरानगरचे जॉगर्स त्रस्त; स्प्रिंकलर धूळखात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com