Nashik Ice Business : मालेगावी बर्फ व्यवसायाला घरघर! वाढते विजचे दर; धंदा, लग्नसमारंभ, गोळ्यासाठी मागणीही घटली

Nashik News : एकीकडे उन्हाचा तडाखा वाढल्याने मागणी वाढत असताना शहरात बर्फ व्यवसायाला घरघर लागली आहे
Ice Business
Ice Businessesakal

मालेगाव : एकीकडे उन्हाचा तडाखा वाढल्याने मागणी वाढत असताना शहरात बर्फ व्यवसायाला घरघर लागली आहे. येथे पाच वर्षात सात कारखाने बंद झाले आहेत. वाढते वीज बिल, मजुरीत वाढ झाल्याने येथील अनेक कारखाने बंद पडले आहे. सध्या येथे सहा बर्फ कारखान्यात बर्फ तयार केला जात आहे. यातील काही कारखाने बंद होण्याचा मार्गावर असल्याचे बर्फ कारखानदारांनी ‘सकाळ’ला सांगितले. (Nashik malegaon Ice Business increasing electricity rates Demand decreased news)

ऊन्हाळ्यात बर्फला मोठी मागणी वाढते. मार्च ते मे पर्यंत कसमादे परिसरात उन्हाचा तडाखा वाढतो. मालेगावचे तापमान राज्यात पहिल्या क्रमांकावर असते. तसेच या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराई असते. लग्न सोहळा व उन्हाचे समीकरण जुळून येते.

त्यामुळे कसमादे परिसरात लिंबू शिकंजी, बर्फगोळा, कुल्फी, आइस्क्रीम, रसवंती, मसाले ताक यांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात लागतात. बर्फ बनविणाऱ्या कारखान्यांना विजेचे दर वाढल्याने परवडत नाही. त्यामुळे अनेक कारखाने गेल्या पाच वर्षापासून बंद पडले आहे. येथे बर्फ सन २०१९ मध्ये बर्फ २ रुपये किलोने मिळत होता. सध्या बाजारात ३ ते ४ रुपये किलोने बर्फाची विक्री होते.

अशी झाली विक्रीत घट

कोरोनाआधी गल्लोगल्ली बर्फ गोळा विक्री करणाऱ्या हातगाड्या असायच्या. बर्फ, साखर, रंग व इतर साहित्य महाग झाल्याने अनेकांनी गोळा बंद केला आहे. मटका, डबा कुल्फी बनविणाऱ्या अनेक हातगाड्या बंद झाल्या आहेत. या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर व्हायचा.

सध्या गल्लोगल्ली प्रत्येक किराणा दुकान व आईस्क्रिम पार्लरवर मोठ्या कंपन्यांनी दुकानदाराला डिपफ्रीज दिले आहेत. तसेच कंपनीकडून दुकानदाराला तयार केलेली कुल्फी, आइस्क्रीम, कोन, शितपेयांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. डिपफ्रीज आल्याने बर्फ विक्रीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  (latest marathi news)

Ice Business
Pankaja Munde : ज्योती मेटे निवडणूक लढवण्यावर ठाम; शरद पवार गटाने तिकीट का नाकारलं? मेटे म्हणाल्या...

लग्न समारंभातून बर्फ हद्दपार

लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात पाणी थंड करण्यासाठी बर्फाचा वापर व्हायचा. सध्या बर्फाची जागा थंड पाण्याच्या जारने घेतली आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणावर लग्न समारंभात मठ्ठा, पाण्यामध्ये बर्फ टाकला जायचा. जार आल्याने बर्फाचे प्रमाण कमी झाले आहे. अनेक बर्फ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी कारखाने बंद करून जारचा व इतर व्यवसाय सुरु केला आहे. शहर व ग्रामीण भागातही जारची क्रेज वाढल्याने छोटेखानी कार्यक्रमापासून ते मोठ्या कार्यक्रमात जारचा वापर वाढला आहे. बर्फाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

रमजान पर्वातही मागणी घटली

रमजान पर्वात विशेष बाजारात पाच रुपयाला अर्धा किलो बर्फाचा तुकडा विकला जायचा. सध्या प्रत्येकाच्या घरात फ्रिज आल्याने घरीच थंड पाणी मिळते. रमजानमध्ये मोठ्या प्रमाणात विशेष बाजारात बर्फाची विक्री करणाऱ्या हातगाड्या असायच्या. गेल्या दोन वर्षापासून त्याचे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांनी घटले आहे.

Ice Business
Champions Trophy 2025 : भारत पाकिस्तानात तेव्हाच खेळेल जेव्हा.... अनुराग ठाकूर यांचं चॅम्पियन्स ट्रॉफीसंदर्भात मोठं वक्तव्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com