Lemon Rates Hike: मालेगावी उन्हाचे चटके बसताच लिंबूने गाठली शंभरी! उत्पादन घटल्याने दर वाढण्याची शक्यता, शीतपेयांनाही मागणी

Nashik News : जानेवारीत तीस रुपये किलो रुपये दराने मिळणारे लिंबू सध्या घाऊक बाजारात ८० ते ९० रुपये किलोने मिळत आहे
Lemon
Lemonesakal

मालेगाव : शहर व परिसरात उन्हाचे चटके बसू लागले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शीतपेयांची दुकाने थाटली आहे. जानेवारीत तीस रुपये किलो रुपये दराने मिळणारे लिंबू सध्या घाऊक बाजारात ८० ते ९० रुपये किलोने मिळत आहे. (Lemon Rates Hike) किरकोळ बाजारात लिंबूने शंभरी गाठली आहे. उन्हामुळे लिंबू शिखंजी, लिंबू सरबत, रसवंती, लिंबू-सोडा यासह विविध शितपेयांच्या दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे. परिणामी, लिंबूंना मागणी वाढली आहे. (nashik Malegaon lemon rates hike marathi news)

शहर व परिसरात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. येथे अवघ्या तीस रुपये किलोने मिळणारे लिंबु सध्या शंभर रुपये किलो दराने मिळत आहेत. काही ठिकाणी दहा रुपये नगाप्रमाणे लिंबू मिळत आहे. येथील भाजीपाला बाजारात लिंबूचे ७० ते ८० क्रेट्स विक्रीसाठी येत आहे.

एप्रिल व मे महिन्यात लिंबू दोनशे पार होणार जाण्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. येथे गावराणी लिंबूला मागणी जास्त आहे. चाळीसगाव तालुक्यातील गुढे, उंबरखेड व मालेगाव तालुक्यातील कुकाणे, वडगावसह विविध भागांतील लिंबू विक्रीला येत आहे. (Latest Marathi News)

Lemon
Nachani Rates Hike: नागलीच्या पापडची चव महागणार! कमी उत्पादनामुळे भावात पायलीमागे 50 रुपयांनी वाढ

पंधरा दिवसांपूर्वी चाळीसगाव भागात गारपीट व अवकाळी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात लिंबूच्या बागेचे नुकसान झाले. लिंबू व नवीन येणाऱ्या फुलांची गळती झाल्याने आगामी काळात लिंबू भाव खाणार आहेत. एप्रिल व मे महिन्यातील कडक ऊन, यात्रोत्सव, तसेच लोकसभा निवडणूक प्रचारामुळे शितपेयांच्या दुकानांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. कसमादे परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने लिंबू उत्पादनात आधीच घट होणार आहे.

"गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घाऊक बाजारात लिंबूची आवक कमी आहे. गेल्यावर्षी दीडशे क्रेट्स लिंबू विक्रीसाठी येत होता. सध्या पन्नास टक्के घट झाली आहे. एप्रिल व मे महिन्यात दरात दुप्पटीने वाढ होणार आहे. अनेक शेतकऱ्यांकडे लिंबू कमी प्रमाणात राहिला आहे."

- सुनील बाने, लिंबूचे घाऊक व्यापारी, मालेगाव

"यावर्षी पाणी कमी असल्याने लिंबूचे उत्पादन घटले आहे. एप्रिलमध्ये लिंबूचे दर गगनाला भिडतील. सध्या शेतकऱ्यांकडे पाहिजे तसा माल शिल्लक नाही."

- सोनू ह्याळीज, शेतकरी, कुकाणे

Lemon
Vegetables Rates Hike: सर्वच भाज्यांच्या दरांत मोठी वाढ! आठवडे बाजाराला उन्हाचा तडाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com