Nashik News : पैशांसाठी अल्पवयीन मुलीला विकले; कळवण तालुक्यातील घटना

Nashik : उपवर मुलांना लग्नासाठी वधू मिळत नसल्याने विवाह लावून देणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
child marriage
child marriageesakal

Nashik News : उपवर मुलांना लग्नासाठी वधू मिळत नसल्याने विवाह लावून देणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. जन्मदात्या बापाने आपल्या १६ वर्षीय मुलीला लग्नासाठी अज्ञातांच्या हवाली केले. त्यांनी या मुलीला रानवड (ता. निफाड) येथे नेत वर पक्षाकडून अडीच लाख रुपये घेऊन तिचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहानंतर सासरच्यांनी अल्पवयीन मुलीला विश्वासात घेत विचारपूस केल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, कळवण तालुक्यातील आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nashik Minor girl sold for money in kalwan )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने कळवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ७ ते १७ एप्रिलदरम्यान हा घटनाक्रम घडला. शिरसा (ता. कळवण) येथील आदिवासी कुटुंब कामानिमित्त निवाणे गावाच्या शिवारात वास्तव्यास आहे. ७ एप्रिलला पीडितेच्या बापाने तिला बाहेर नेत एका कारमध्ये आलेल्या चौघांबरोबर जाण्यास सांगितले.

कारमधील चौघे तुझे मामा आहेत, ते तुझे लग्न लावून देणार असल्याचे सांगत तिला बळजबरीने त्यांच्याबरोबर जाण्यास भाग पाडले. चौघांनी तिला सुरगाणा तालुक्यातील डोंगराळे येथे नेत अज्ञात ठिकाणी दोन दिवस डांबून ठेवले. त्यानंतर तिला दुसऱ्या व्यक्तीकडे नेण्यात आले. या वेळी ठार करण्याची धमकी दिल्याचे पीडितेने पोलिसांना जबाबात सांगितले.

त्यानंतर पीडितेला रानवड येथे नेत विवाहासाठी तयार केले आणि शुक्रवारी (ता. १२) सकाळी रानवड येथे ज्ञानेश्वर नामक तरुणाशी खोटे आई- वडील- मामा यांच्या उपस्थितीत तिचा विवाह लावून देण्यात आला. विवाहानंतर सासरच्यांनी पीडितेला विश्वासात घेत विचारपूस केल्याने तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर सासरच्यांनी तत्काळ तिच्या खऱ्या आई-वडिलांना बोलावून घेत याबाबत विचारणा केली व पीडितेला घेऊन थेट कळवण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

child marriage
Nashik Crime News : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांची गस्ती कुचकामी

त्यानुसार कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पीडितेच्या वडिलांसह अलिमन गोविंदा लिलके (वय ७०), विमल अलिमन लिलके (५५), नवसू मोतीराम गांगुर्डे (४५), शबीबाई नवसू गांगुर्डे (३६, सर्व रा. डोंगराळे, ता. सुरगाणा), पंढरीनाथ रघुनाथ फुगट (५६), मधुकर शंकर शिंदे (५३, रा. नांदूर खुर्द, ता. निफाड) या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक जगदीश बोरसे तपास करीत आहेत.

रात्रीच मेकअप अन् मेंदी

पीडितेला रानवड येथे नेल्यावर गुरुवारी (ता. ११) रात्री मेकअप करून मेंदी काढण्यात आली. या टोळीकडे संपूर्ण साहित्य असल्याने त्यांनी ही सर्व बनवाबनवी केली. विवाहाच्या आधी सव्वा लाख रुपये व नंतर सव्वा लाख रुपये या टोळीने घेतल्याची माहिती पीडितेला सासरच्या मंडळींनी दिली.

...म्हणून आला संशय

विवाहानंतर मूळ परतणीची पद्धत सर्वत्र आहे. मात्र, मुलीकडच्यांनी घाईघाईत विवाह करण्यास भाग पाडले. शिवाय, मूळ परतणीलाही घ्यायला कोणीच न आल्याने सासरच्यांना संशय आला. त्यावर त्यांनी पीडितेला विश्वासात घेत विचारपूस केल्याने सर्व उलगडा झाला.

child marriage
Nashik Crime News : बॅग लिफ्टिंग गुन्ह्यातील दोघांना अटक; संशयितांकडून स्वीफ्ट कार जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com