Nashik News: मतदानासाठी वापरात येणाऱ्या EVMची सरमिसळ! 6 दिवस चालणार प्रक्रिया; दिवसभरात 4 हजार व्हीव्हीपॅटची सरमिसळ पूर्ण

Nashik News : लोकसभा निवडणुकीत मतदानाकरीता वापरात येणाऱ्या मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) सरमिसळ करण्याची प्रक्रीया सोमवारी (ता.१५) सुरू करण्यात आली
evm machine
evm machineesakal

Nashik News : लोकसभा निवडणुकीत मतदानाकरीता वापरात येणाऱ्या मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) सरमिसळ करण्याची प्रक्रीया सोमवारी (ता.१५) सुरू करण्यात आली. दिवसभरात चार हजार व्हीव्हीपॅटची सरमिसळ पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिली. (Nashik mix of EVM used for voting process will take 6 days 4000 VVPAT collection completed in day marathi news)

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर व्हीव्हीपॅटचे ‘फर्स्ट रँडमायझेशन’ करण्यात आले. मंगळवारी दुपारपर्यंत एकूण सात हजार ३२ व्हीव्हीपॅटचे रॅन्डमायजेशन पूर्ण होणार असून मंगळवारी हे मशिन्स त्या-त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. लोकसभेच्या नाशिक, दिंडोरी आणि धुळे मतदारसंघांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे.

१० ऑगस्ट २०२३ रोजी ‘ईव्हीएम’ची प्राथमिकस्तरावरील तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व यंत्रे सय्यद पिंप्रीतील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली. मतदान प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रे जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांच्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये पाठविण्यात येणार आहेत. (latest marathi news)

evm machine
Electoral Bonds Printing: निवडणूक रोख्यांची नाशिकला छपाई? ॲडव्होकेट्स फार डेमोक्रेसीतर्फे मुख्य महाव्यवस्थापकांना नोटीस

याकरिता ‘रँडमायझेशन’ची प्रक्रिया सोमवारपासून सय्यद पिंपरी येथील स्ट्रॉंग रूममध्ये सुरू करण्यात आली. शनिवार (ता.२०) पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. सय्यद पिंप्री येथील सरमिसळ प्रक्रियेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्षासह छोट्या पक्षांचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. पहिल्या दिवशी काही तांत्रिक अडचणींमुळे सरमिसळ प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाला. त्यामुळे दिवसभरात चार हजार व्हिव्हीपॅटचे ‘रॅन्डमायजेशन’ पूर्ण झाले.

evm machine
Nashik ZP News : दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी 19 एप्रिलचा अल्टिमेटम! 609 पैकी 198 कर्मचाऱ्यांची पडताळणीकडे पाठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com