Nashik Monsoon Update: इगतपुरी -त्र्यंबकेश्‍वर अन पेठ-सुरगाणामध्ये पाऊस! दारणा धरणातून विसर्ग

गेल्यावर्षी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत १४९.५ टक्के पाऊस झाला होता
darna dam
darna damesakal

Nashik Monsoon Update : घाटमाथ्यावर वरुणराजाची हजेरी कायम आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांमध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या इतर भागात रिमझिम सुरु आहे.

नांदूरमधमेश्‍वर, भावलीपाठोपाठ आता दारणा धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६३.९ टक्के पाऊस झाला असून गेल्यावर्षी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत १४९.५ टक्के पाऊस झाला होता. (Nashik Monsoon Update Rain in Igatpuri Trimbakeshwar and Peth Surgana Discharge from Darna Dam)

जिल्ह्यात आज सकाळपर्यंत काही मंडलात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : इगतपुरी-६९.३, घोटी-१७.५, वाडीवऱ्हे-११.३, नांदगाव सदो-१२.८, टाकेद-१२.८, धारगाव-४८, पेठ-२७.३, जोगमोडी-२१.३, कोहोर-२७.३, त्र्यंबकेश्‍वर-२८, वेळुंजे-२५, हरसूल-१९, उंबरठाण-२१.३, बाऱ्हे-१५.८, मनखेड-१४, सुरगाणा-२१.३, ननाशी-२९.३, नांदगाव-१४.८, जातेगाव-११, देवळाली-१४.५, सातपूर-१२, माडसांगवी-१४.५, मखमलाबाद-१३.३, देवगाव-१४.३, नायगाव-१२.५, पांगरी-१३.

दरम्यान, नांदूरमधमेश्‍वर धरणात ७ टक्के जलसाठा ठेऊन ५ हजार ५७६ क्यूसेस विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. शंभर टक्के भरलेल्या भावली धरणातून ३८२, तर दारणा धरणात ७८ टक्के जलसाठा ठेवत ३ हजार ५८४ क्यूसेस विसर्ग करण्यात येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

darna dam
Monsoon Update : 'या' जिल्ह्यात सर्व धबधब्यांवर पर्यटकांना जाण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला महत्वाचा आदेश

इगतपुरी तालुक्यात २४ तासात २८.६, त्र्यंबकेश्‍वरमध्ये २४, पेठमध्ये २५.३, तर सुरगाण्यात १६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरी तालुक्यात आतापर्यंत ५७.६, त्र्यंबकेश्‍वरमध्ये ६१.४, पेठमध्ये ८०.६, सुरगाण्यात ८२.५ टक्के पाऊस झाला आहे.

इतर तालुक्यात २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये आणि आतापर्यंतच्या पावसाची टक्केवारी कंसात- मालेगाव : १.५(८२.८), बागलाण :१.८ (६९.७), कळवण : ५.८ (८६.२), नांदगाव : ८.६ (६१.१), नाशिक : ९.३ (५४), दिंडोरी : ७.१(११.३), निफाड : ५.२ (७७.६), सिन्नर : ६.४ (५२.४), येवला : ३ (७३.९), चांदवड : १.९ (५०), देवळा : ०.९ (७१.६). पावसाची आतापर्यंतची हजेरी पाहता, बागलाण, नांदगाव, नाशिक, सिन्नर, चांदवड तालुक्याची जोरदार पावसाची गरज कायम असल्याची स्थिती आहे.

darna dam
Nashik Water Crisis: कांद्याच्या आगारात पाणीटंचाईचा कहर; लासलगावमध्ये महिन्यापासून पिण्याचे पाणीच नाही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com