Nashik News : मोसम खासगी मार्केटचा परवाना अखेर रद्द! पणन संचालकांकडे केलेल्या तक्रारी घेतली दखल

Nashik News : नामपूर बाजार बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार यांनी याबाबत पणन संचालकांकडे केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेवून खासगी बाजार समितीला चाप बसला आहे.
license canceled
license canceledesakal

नामपूर : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येथील बाजार समितीच्या कांदा व्यापाऱ्यांनी पुढाकार घेवून स्थापन केलेल्या मोसम कृषी खासगी मार्केटचा परवाना पुणे येथील पणन संचालक विकास रसाळ यांनी निलंबित केल्याने खासगी बाजार समित्या चालविणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांना ‘जोर का झटका’ बसला आहे. नामपूर बाजार बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार यांनी याबाबत पणन संचालकांकडे केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेवून खासगी बाजार समितीला चाप बसला आहे. (Nashik Mosam private market license canceled news)

मार्च अखेर, आर्थिक ताळेबंद, मजूर टंचाई, आर्थिक टंचाई, लेव्हीचा मुद्दा आदी कारणांमुळे नामपूर बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव गेल्या २१ दिवसांपासून बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचे दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. बाजार समितीचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लेव्हीच्या प्रश्‍नावर तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी येथील कांदा व्यापाऱ्यांनी पुढाकार घेवून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कुपखेडा शिवारात गट नंबर ५२, ५३, ५४/१, ५४/२ येथे बाजार समितीच्या कांदा खरेदी केंद्राच्या शेजारीच मोसम खासगी कृषी मार्केटचा शुभारंभ केला. परंतु, शेतकऱ्यांसाठी कोणत्याही पायाभूत सुविधा नसणे, आदर्श आचारसंहिता कालावधी, सभापती/सचिवांचे पत्र आदी बाबींचा सारासार विचार करून मोसम खासगी मार्केटचा परवाना पणन संचालकांनी रद्द केला आहे.

शेतकऱ्यांच्या फसवणुकीची शक्यता

नामपूर बाजार समितीमधील सर्व नोंदणीकृत व्यापारी/आडत्यांनी वेगळा गट स्थापन करुन नामपूर बाजार समितीच्या नळकस रोडवरील लिलाव आवारालगत मोसम कृषि खासगी मार्केट प्रा. लि. या नावाने खासगी बाजार समिती स्थापन केलेली आहे. कुपखेडा ग्रामपंचायत हद्दीतील गट नं. ५२, ५३ व ५४ मध्ये खासगी मार्केटसाठी कुपखेडा ग्रामपंचायतीने अटी-शर्थीच्या अधीन राहून ना-हरकत दाखला दिलेला आहे.

पायाभूत सुविधांमध्ये दर्शविलेले व्यापारी गाळे तात्पुरत्या स्वरुपाचे पत्र्याचे शेड आहेत. तसेच, बांधकाम करण्यापूर्वी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन, नगररचना विभाग, महसूल वन विभागाकडून अकृषक परवानगी घेणे बंधनकारक असतानाही त्याची कुठलीही अंमलबजावणी केलेली नाही. यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची फसवणूक नाकारता येत नाही.  (latest marathi news)

license canceled
PM Modi: सत्तेत पुन्हा येण्याची जनतेने संधी दिल्यास बेकायदा स्थलांतर रोखू : पंतप्रधान मोदी

हमाल/माथाडींवर उपासमारीची वेळ

मोसम कृषी खासगी मार्केटचे अध्यक्ष तसेच सदस्यांच्या कुटुंबात नाफेड/एन.सी.सी.एफ परवानाधारक व थेट परवानाधारक आहेत. यात शासनाची मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच, सदर खासगी बाजार समितीचा परवाना हा नामपूर बाजार समितीतील नोंदणीकृत व्यापारी/आडत्यांना दिलेला असल्याने नामपूर बाजार समितीमधील सर्व लिलाव प्रक्रीया बंद पडलेली आहे.

खाजगी बाजार समिती ही नामपूर बाजार समितीतील नोंदणीकृत व्यापाऱ्यांची असल्याने लिलाव प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची स्पर्धा निर्माण होणार नसल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक होऊन शासनाचे उत्पन्नही बुडणार आहे.

बाजार समितीमधील हमाल/माथाडींवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी लेखी तक्रार बाजार समिती प्रशासनाने केल्यानंतर पणन संचालकांनी कारवाई केली आहे. मोसम मार्केटच्या संचालिका कल्पना कुणाल मुथा व जिल्हा निबंधकांना आदेशाची प्रत देण्यात आली आहे.

"मोसम खासगी मार्केटच्या संचालकांनी पणन खात्याची दिशाभूल केली आहे. त्यामुळे कुपखेडा शिवारातील मोसम कृषी खासगी मार्केट पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात येत आहे. सदर खासगी बाजार आवारामध्ये शेतमाल खरेदी-विक्रीचे कोणतेही व्यवहार करू नयेत, याची शेतकऱ्यांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी."- विकास रसाळ, पणन संचालक, पुणे

license canceled
Nashik News : गाळाने अडविला 300 दशलक्ष घनफूट साठा! चणकापूर धरणातील स्थिती; उपाययोजनेची अपेक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com