Nashik News : पाणीटंचाईने घेतला माय-लेकींचा बळी; विहिरींवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या आई अन मुलीचा बूडून मृत्यू

Nashik News : या परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने दोर-बादलीच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
Drowned
Drownedesakal

झोडगे (जि. नाशिक) : येथील गावाशेजारी असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या माय-लेकींचा पाय घसरून विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ४) दुपारी घडली. नीताबाई जाधव व इच्छामणी जाधव अशी मृत माय-लेकींची नावे आहेत. (Nashik Mother daughter drowned to death news)

झोडगेसह परिसराला सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. वीस दिवसांनंतर या ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते. अशा वेळेस महिलांना गाव परिसरातील विहिरींवर धुण्यासाठी जावे लागते; तर पशुपालक शेती शिवारातील विहिरींवर जाऊन जनावरांची तहान भागवत असतात.

या परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने दोर-बादलीच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. गुरुवारी दुपारी नीताबाई बाळू जाधव (वय ४७) व मुलगी इच्छामणी जाधव (१६) या दुपारच्या सुमारास विहिरीवर गेल्या असता पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरून दोघी विहिरीत पडल्या.  (latest marathi news)

Drowned
Nashik Fraud Crime : बांधकाम व्यावसायिकाला 28 कोटींचा गंडा; जागा मालकाने संगनमताने केली फसवणूक

यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास पशुपालक घराकडे येत असताना विहिरीत बुडालेल्या माय-लेकी दिसून आल्या. त्यांनी तत्काळ ग्रामस्थांना कळविले. ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या वेळी पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलिस नाईक सतीश मोरे, पोलिस शिपाई मयूर भावसार, राऊत, तलाठी सुधीर कदम आदींनी घटनास्थळी जाऊन माय-लेकींना विहिरीतून बाहेर काढत मालेगाव येथे सामान्य रुग्णालय पाठविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. नीताबाई जाधव या कोतवाल शिवाजी जाधव यांच्या मातोश्री, तर इच्छामणी जाधव बहीण होत.

Drowned
Crime News: पथकाने पाठलाग करून केले ५४ लाखांचे अमली पदार्थ जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com