Latest marathi news | नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना श्रावण मास पावणार!

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात आला असला तरी अद्यापही फरकाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही.
Nashik Municipal Corporation Fund
Nashik Municipal Corporation Fund esakal

नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात आला असला तरी अद्यापही फरकाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. फरकाच्या रकमेचा आकडा वाढत आहे, तशी कर्मचाऱ्यांमध्येदेखील नाराजी आहे. त्या अनुषंगाने आयुक्त रमेश पवार यांनी फरकाची रक्कम पाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात फरक जमा करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. साधारण ऑगस्ट महिन्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. जवळपास ५५० कोटी रुपयांचा फरक अदा करताना प्रशासनाला आर्थिक मंदी मध्ये तारेवरची कसरत करावी लागणार आहे. (Latest marathi news)

Nashik Municipal Corporation Fund
नाशिकच्या राजकारणाला फुटताहेत नवे धुमारे

केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना ५ वर्षे विलंबाने आयोग लागू करण्यात आला. आयोग लागू करताना १ जानेवारी २०१६ पासून ते आयोग लागू झाल्यापर्यंतचा फरक देण्याचे आश्वासित करण्यात आले होते. १ एप्रिल २०२१ पासून वेतनश्रेणी लागू झाली. त्यामुळे फरकाची रक्कम अदा करावी, अशी मागणी कर्मचारी वर्गाकडून होत होती. मात्र, महापालिकेची आर्थिक परिस्थिती हलकीशी असल्याने फरकाची रक्कम देताना कसरत करावी लागत होते. आयुक्त रमेश पवार यांनी कर्मचाऱ्यांना खूष करण्याचा निर्णय घेत फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट महिन्यापासून फरकाची रक्कम आधार केली जाईल. साधारण पाच टप्प्यांमध्ये ही फरकाची रक्कम अदा केली जाईल.

Nashik Municipal Corporation Fund
Latest news | व्यसनाधीन वायरमनमुळे गाव अंधारात; कठोर कारवाईची मागणी

तिजोरीवर अतिरिक्त भार

महापालिकेत १८१ संवर्गात ४६७३ कायम व ३२३१ सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. वेतन व सेवानिवृत्ती वेतनावर वार्षिक जवळपास ३१० कोटी रुपये खर्च होतात. वेतन आयोगाचा फरक देण्यास सुरवात झाल्यानंतर पालिकेच्या तिजोरीवर जवळपास ६५ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. परंतु, असे असले तरी कर्मचाऱ्यांना देय असलेली रक्कम हा त्यांचा हक्क असल्याची भूमिका आयुक्त पवार यांनी घेतली आहे.

''सातव्या वेतन आयोगाबरोबरच फरकाची रक्कम अदा करण्याचा विषय अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे. लवकरच फरकाची रक्कम अदा केली जाईल.'' - रमेश पवार, आयुक्त, महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com