Nashik News : मुस्लिम सेवेकऱ्यांनी गुरुमाउलींना दिली श्रीरामाची मूर्ती भेट; त्र्यंबकेश्वर समर्थ गुरुपीठात सर्वधर्म समभावाचा उत्तम आदर्श

Nashik : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने छोटेखानी सोहळ्यात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर समर्थ गुरुपीठात झाला.
Aleem Sheikh gifting Gurumauli Annasaheb More with Shriram idol and replica of Ram Temple in Ayodhya on his birthday at Srikshetra Trimbakeshwar Samarth Gurupeeth.
Aleem Sheikh gifting Gurumauli Annasaheb More with Shriram idol and replica of Ram Temple in Ayodhya on his birthday at Srikshetra Trimbakeshwar Samarth Gurupeeth.esakal

Nashik News : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने छोटेखानी सोहळ्यात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर समर्थ गुरुपीठात झाला. या वेळी मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली आणि सर्वांच्या वतीने अलीम शेख यांनी गुरुमाउलींना श्रीराम मूर्ती आणि अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती भेट दिली. उपस्थित हजारो सेवेकरी या सर्वधर्म समभावाच्या प्रसंगाने भारावून गेले. ()

अखिल भारतीय समर्थ सेवामार्ग व समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांचा वाढदिवस दरवर्षी कुठलाही गाजावाजा न करता साधेपणाने व विविध अध्यात्मिक सेवा रुजू करून साजरा केला जातो, त्याप्रमाणे तो यावर्षीही साजरा होत असताना त्र्यंबकेश्वर गुरुपीठात दोन हजार ७०० महिला, पुरुष सेवेकऱ्यांनी यानिमित्त एकदिवसीय श्रीगुरुचरित्र पारायण केले. (latest marathi news)

Aleem Sheikh gifting Gurumauli Annasaheb More with Shriram idol and replica of Ram Temple in Ayodhya on his birthday at Srikshetra Trimbakeshwar Samarth Gurupeeth.
Nashik News : मॉडेल रोडच्या सलग कामाला विरोध; 4 टप्प्यात कामाची अपेक्षा

सकाळी सातला सुरू झालेले एकदिवसीय पारायण दुपारी दीडला पूर्ण झाल्यावर सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. दुपारी गुरुमाउली अभीष्टचिंतन सोहळ्यात ग्रंथतुला करून या ग्रंथाचे मोफत वाटप करण्यात आले. राज्यभरातून प्रातिनिधिक स्वरूपात आलेल्या सेवेकऱ्यांनी आपल्या शब्दसुमनातून शुभेच्छा दिल्या.

सुमारे सात हजार केंद्रांच्या माध्यमातून जगभर सक्रिय असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवामार्गातून धर्म, जात, पात, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेद न ठेवता सर्वसमावेशक कार्य जोमाने केले जात आहे. सर्वधर्मीयांचा ओढा सेवामार्गाकडे दिसून येतो आहे. विशेषतः मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सेवेत सहभागी आहेत. आजच्या सोहळ्यातही मुस्लिम बांधवांनी मनःपूर्वक सहभागी होऊन गुरुमाउलींना शुभेच्छा दिल्याने सर्वच भारावून गेले.

Aleem Sheikh gifting Gurumauli Annasaheb More with Shriram idol and replica of Ram Temple in Ayodhya on his birthday at Srikshetra Trimbakeshwar Samarth Gurupeeth.
Nashik News : शालेय पुस्तकांचा पुनर्वापर करूया...! ‘टेक्स बुक एक्स्चेंज ड्राईव्ह: रंगूबाई जुन्नरे शाळेचा स्तुत्य उपक्रम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com