Nashik Protest
Nashik Protestesakal

Nashik Protest News : जिल्हा बॅंकेत ठेवीवरील व्याजासाठी पतसंस्था व्यवस्थापकाचे नग्न आंदोलन

Nashik Protest : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत पगारवाढीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच आता ठेवीदारही आक्रमक झाले आहेत.

Nashik Protest News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत पगारवाढीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच आता ठेवीदारही आक्रमक झाले आहेत. पतसंस्थेचे ठेवींवरील व्याज मिळावे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सहकारी संस्था मर्या. पतसंस्थेचे व्यवस्थापक भास्कर झाल्टे यांनी गुरुवारी (ता. २५) बॅंक व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्या दालनात नग्न आंदोलन केले. ठेवींवरील व्याज मिळाले पाहिजे, अशी मागणी लावून धरत त्यांनी दोन तास ठिय्या मांडला. (Naked protest of credit union manager for interest on deposit )

अखेर बॅंक प्रशासक, पोलिस यांच्या मदतीने झाल्टे यांनी आंदोलन मागे घेतले. मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज सहकारी संस्था मर्या. पतसंस्थेच्या जिल्हा बॅंकेत सन २०१६ पासून ९५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवींवर या वर्षाचे थकीत व्याज मिळावे, अशी झाल्टे यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी वारंवार बॅंकेत फेऱ्याही मारून व्याज मिळत नव्हते. त्यावर संतप्त झालेल्या झाल्टे यांनी गुरुवारी सायंकाळी व्यवस्थापकीय संचालक यांच्या दालनात नग्न दाखल होत ठिय्या आंदोलन सुरू केले. (latest marathi news)

Nashik Protest
Nashik Protest News : गटप्रवर्तक, आशासेविका 16 ऑक्टोबरपासून संपावर; प्रलंबित मागण्या मान्य करण्याचा उद्देश

ठेवींवरील व्याज द्या, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी त्यांच्याशी चर्चा करीत, कायदेशीर अडचणी असल्याचे सांगितले. निधी देण्यासाठी परवानगीची गरज लागणार आहे, त्यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला जाईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, झाल्टे यांनी पतसंस्थांचा ठेवी देण्याचा ठराव झालेला असताना त्या दिल्या जात नसल्याचा आरोप करीत आंदोलनावर ठाम राहिले. भद्रकाली पोलिसांनीही त्यांची समजूत काढली. तब्बल एक ते दीड तास समजूत काढल्यावर झाल्टे यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

बॅंकेत पतसंस्थांच्या २१६ कोटी ठेवी

जिल्हा बॅंकेत जिल्ह्यातील पतसंस्थांच्या तब्बल २१६ कोटींहून अधिक ठेवी अडकलेल्या आहेत. या ठेवी मिळाव्यात, यासाठी जिल्हा बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत पतसंस्थेतील ठेवीदारांनी ठेवी मिळाव्यात, असा ठराव केला होता. तसेच, ठेवींवरील व्याज तरी बॅंकेने द्यावे, अशी मागणी केली होती. त्या वेळी व्याज देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन बॅंक प्रशासनातर्फे देण्यात आले होते.

Nashik Protest
Nashik Protest News : जिल्हा बॅंक प्रशासकासमोर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या; कोतवाल यांची मध्यस्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com