NEET Admission 2024 : ‘नीट’च्‍या नोंदणीची 16 पर्यंत वाढीव मुदत

NEET Admission : वैद्यकीय शाखेच्‍या विविध पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षेच्‍या आधारे प्रवेश दिले जाणार आहे.
NEET Admission
NEET Admissionesakal

NEET Admission 2024 : वैद्यकीय शाखेच्‍या विविध पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षेच्‍या आधारे प्रवेश दिले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासाठी घेतल्‍या जाणाऱ्या ‘नीट २०२४’च्‍या नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळावी, यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीतर्फे परीक्षेच्‍या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. (nashik NEET Admission 2024 Extended marathi news)

त्‍यानुसार विद्यार्थ्यांना शनिवार (ता. १६)पर्यंत परीक्षा अर्ज व शुल्‍क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. ‘एनटीए’तर्फे नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एन्ट्रान्‍स टेस्‍ट (नीट) २०२४ परीक्षा येत्‍या ५ मेस राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे. तसेच देशाबाहेरील विविध १४ शहरांमध्येही या परीक्षेचे आयोजन केले आहे.

ऑफलाइन अर्थात पेन व पेपरवर आधारित या परीक्षेच्‍या आधारे वैद्यकीय शाखेतील पदवी अभ्यासक्रम असलेल्‍या एमबीबीएस, बीडीएस यांसह आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस), फिजिओथेरेपीसह इतर अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे.

नीट परीक्षा नोंदणीची मुदत संपत असताना ‘एनटीए’नेही मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार परीक्षा अर्ज भरण्याची मुदत शनिवारी (ता. १६) १० वाजून ५० मिनिटांपर्यंत आहे. ऑनलाइन शुल्‍क भरण्याची मुदत याच दिवशी ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत दिलेली आहे. (latest marathi news)

NEET Admission
NEET PG 2024 परीक्षा अखेर पुढे ढकलली; NBEची अधिकृत घोषणा

एमएचटी-सीईटीसाठी विलंब शुल्‍कासह नोंदणी

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्‍यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षेद्वारे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, कृषी संलग्‍न अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जाणार आहे. पीसीबी आणि पीसीएम अशा दोन ग्रुपमध्ये १६ ते ३० एप्रिल या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.

या परीक्षेत प्रविष्ट होण्याकरिता नियमित शुल्‍कासह नोंदणीची मुदत संपली आहे. आता पाचशे रुपये विलंब शुल्‍क अदा करून इच्‍छुक विद्यार्थ्यांना या शुक्रवार (ता.१५) पर्यंत परीक्षा अर्ज भरता येईल. ऑनलाइन शुल्‍क भरण्यासाठी शनिवार (ता. १६)पर्यंत मुदत असेल.

नर्सिंगच्‍या सीईटीची शुक्रवारपर्यंत मुदत

गेल्‍या शैक्षणिक वर्षापासून नर्सिंग अभ्यासक्रमाला राज्‍यस्‍तरीय प्रवेश परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिले जात आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेशासाठी एमएच-नर्सिंग सीईटी २०२४ ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेच्‍या नोंदणीला यापूर्वी मुदतवाढ जाहीर केली होती. त्‍यानुसार इच्‍छुक व पात्र विद्यार्थी शुक्रवार (ता. १५)पर्यंत परीक्षा अर्ज भरू शकतील.

NEET Admission
NEET Admission : ‘नीट’च्या नोंदणीची 9 मार्चपर्यंत मुदत; वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com