Kalidas Kala Mandir : ‘कालिदास’च्या नियमावलीत फेरबदल; 1 एप्रिलपासून नवीन नियमावली

Kalidas Kala Mandir : नियमांना वैतागलेले असताना यासंदर्भात बुधवारी (ता. २७) नाट्य व्यावसायिक व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सदस्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली.
Kalidas Kala Mandir
Kalidas Kala Mandiresakal

Kalidas Kala Mandir : महाकवी कालिदास कलामंदिरात १ एप्रिलपासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे परंतु, नाट्य व्यावसायिक आधीच या नियमांना वैतागलेले असताना यासंदर्भात बुधवारी (ता. २७) नाट्य व्यावसायिक व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सदस्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. त्यानुसार नवीन नियमावली जाणून घेत त्यात बदल करण्याची मागणी येत्या काळात नाट्य व्यावसायिक करणार असल्याने नियमावलीत आणखी किती बदल होतील याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. (nashik New rules will be implemented in Mahakavi Kalidas Kalamandir from April 1 marathi news)

महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी आता आयोजकांकडून वीज वापर शुल्क आकारण्यात येणार आहे. पूर्वी वीज मोफत मिळत होती मात्र, आयोजकांकडून कार्यक्रमात लाईट्‌सचा अतिवापर केला जात असल्याने वीज वापराबाबत शुल्क आयोजकांकडून वीज शुल्क आकारले जाणार आहे. यासह कालिदास कलामंदिराच्या अनेक नियमांमध्ये बदल प्रस्तावीत करण्यात आले आहेत.

यासंदर्भात मिळकत विभागाने महासभेकडे सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता आयोजकांना बदल झालेल्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. नवीन नियमानुसार तीन महिन्याच्या आरक्षण केलेल्या कार्यक्रमात पाच वेळा बदल केल्यास त्यास आयुक्तांची मान्यता घेऊन उर्वरित भाडे भरण्यात यावे, असा बदल करण्यात आला आहे. (latest marathi news)

Kalidas Kala Mandir
Kalidas Kala Mandir : ‘कालिदास’चे डिपॉझिट NMCडून ‘जप्त’? नाट्यसंस्थांची 2019 पासून अडकली अनामत

इलेक्ट्रीक अटॅचमेंट, प्लग जोडणी तसेच व्हीडीओ शूटिंग तसेच १ हजार आणि ५०० वॅट वीज वापरासाठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. सध्याच्या ऑनलाइन आरक्षण नियमात ज्या संस्था नियमित नाट्यप्रयोग आयोजित करतात त्यांना एकरकमी दोन लाख रुपये अनामत भरल्यानंतर स्वतंत्र ऑनलाइन आरक्षण की उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, या नवीन नियमावली संदर्भात नाट्य व्यावसायिक चर्चा करून मनपा आयुक्तांना निवेदन देणार आहेत.

आयोजकांना दंड

नवीन नियमावलीत प्रयोग वा कार्यक्रम कालावधीत प्रेक्षागृहात खाद्यपदार्थ, शीतपेय, पाण्याची बाटल्या घेऊन जाता येणार नाही. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी आयोजकांना सहा द्वारपाल नियुक्त करणे आवश्यक असून, तसे न केल्यास धूम्रपान वा प्रेक्षागृहात शीतपेयाच्या बाटल्या आढळून आल्यास आयोजकांकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आयोजकांवर नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असणार आहे.

Kalidas Kala Mandir
Kalidas Kala Mandir : कालिदास कलामंदिर भाडेदर वाढीचा प्रस्ताव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com