CMA Course : ‘CMA’ना अकाउंटंट म्‍हणून मान्‍यता; समान नागरी कायद्याचे विधेयक

CMA Course : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय) यांच्‍या पश्‍चिम विभागाच्‍या स्‍तरावर विद्यार्थ्यांच्‍या प्रादेशिक संमेलनात नावीन्‍यपूर्ण उपक्रमांचा समावेश केला आहे.
CMA
CMAesakal

CMA Course : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएमएआय) यांच्‍या पश्‍चिम विभागाच्‍या स्‍तरावर विद्यार्थ्यांच्‍या प्रादेशिक संमेलनात नावीन्‍यपूर्ण उपक्रमांचा समावेश केला आहे. यात रविवारी (ता. १८) प्रतिसंसद (मॉक पार्लमेंट) साकारली जाणार असून, सदनात समान नागरी कायदा तसेच प्राप्तिकर कायद्यातील अकाउंटंट या संज्ञेत ‘सीएमए’ यांचा समावेश करावा, अशी दोन विधेयके मांडली जातील, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष सीएमए अश्विनकुमार दलवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (CMA Course Accreditation of CMA as Accountant )

परिषदेनिमित्त नाशिकला आलेल्‍या श्री. दलवाडी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्‍हणाले, की या परिषदेनिमित्त सहभागी विद्यार्थी व संघटनेचे सदस्‍य असे सर्व मिळून सर्वांत मोठे आयसीएमए हे मानवी बोधचिन्‍ह (ह्युमन लोगो) मैदानावर साकारणार असून, याची नोंद विश्‍वविक्रमात केली जाणार आहे. नावीन्‍यपूर्णतेवर आधारित विषयांचा समावेश या परिषदेत केला असून, विद्यार्थी व सदस्‍यांना त्‍याचा फायदा होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

CMA
CMA Exam : ‘सीएमए’ परीक्षेतही नाशिककरांची छाप!

मुख्यालयाचे दिल्‍लीत स्‍थलांतर

‘आयसीएमएआय’ या राष्ट्रीय स्‍तरावर कार्यरत संघटनेचे मुख्यालय सध्या पश्‍चिम बंगालमधील कोलकता येथे आहे. परंतु प्रशासकीय सुविधेच्‍या दृष्टीने मुख्यालय दिल्‍ली येथे स्‍थलांतरित केले जाणार असल्‍याचे श्री. दलवाडी यांनी सांगितले. ब्रॅन्ड बिल्डिंगसाठी या धोरणात्‍मक निर्णयाचा फायदा होणार असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले.

‘एआय’ ठरेल उपयुक्‍तच

आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स व त्‍यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रांत बदल होत आहेत. या तंत्रज्ञानामुळे रोजगारावर परिणाम होईल, अशी भीती बाळगायला नको. काही वर्षांपूर्वी संगणक अवगत झाले तेव्‍हादेखील याच स्‍वरूपाची भीती व्‍यक्‍त व्‍हायची. परंतु संगणकाने नोकरीची संकल्‍पना बदलली. तसेच ‘एआय’चा उपयोग करून कामकाजात सुलभता आणणे शक्‍य असून, हे तंत्रज्ञान उपयुक्‍तच ठरेल, असा विश्‍वास श्री. दलवाडी यांनी व्‍यक्‍त केला.

CMA
CMA Foundation Exam 2023 : सीएमए फाउंडेशन परीक्षेत साई अभंग जिल्ह्यात पहिला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com