Nashik News : वडाळारोडवरील नागजी भागात बिबट्या जेरबंद

वडाळारोडवरील नागजी भागातील हॉटेल साई प्रिथमच्या मागील आयेशा मशीद परिसरात बिबट्या निदर्शनास
Nashik News Leopard captured in cage Nagji area Wadala Road nashik
Nashik News Leopard captured in cage Nagji area Wadala Road nashiksakal

जुने नाशिक : वडाळारोडवरील नागजी भागातील हॉटेल साई प्रिथमच्या मागील आयेशा मशीद परिसरात बिबट्या निदर्शनास आला. रहिवास्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होत दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्यास कैद करण्यास यश आले. शहरातील मध्यवर्ती परिसर असलेला नागजी भागात पावणे अकरा वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. येथील आयेशा मशीद परिसरात एका बंगल्याच्या आवारात बिबट्या असल्याचे दिसून आले. परिसरात बिबट्या आल्याचे वृत्त पसरताच खळबळ उडाली होती. रहिवास्यांमध्ये भीतीचे पसरली होती .

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बंगल्या परिसरात नागरिकांनी लाट्याकाट्या घेऊन गर्दी केली होती. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बिबट्यास कैद करण्याचे प्रयत्न सुरू झाले. बिबट्या याठिकाणाहून त्याठिकाणी पळत असल्याने त्यांना त्यास कैद करण्यास अडचण येत होती. रात्री सव्वा बाराच्या सुमारास बिबट्याने बंगल्याच्या गेटवरून बाहेर उडी घेताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यास जाळीत कैद केले. काही नागरिकांनी बिबट्यास मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी , वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मात्र मज्जाव केला. दरम्यान त्यास बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देण्यात आले . त्यानंतर बिबट्यास बंगल्यातून बेशुद्ध अवस्थेत काढून पिंजऱ्यात कैद केले. बिबट्या कैद झाल्याचे समजताच रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com