SAKAL Impact : निफाडमधील ठाकरे नगर उद्यान दुरुस्ती सुरु

SAKAL Impact : शहरातील ठाकरे नगरात असलेल्या उद्यानात गाढव, कुत्रे व इतर प्राण्यांचा मुक्त संचार होता. त्यामुळे येथील नागरिक संतप्त होते.
Yuva Sena District Chief Vikram Randhave inspecting the started work of Thackeray Nagar Park in Niphad City
Yuva Sena District Chief Vikram Randhave inspecting the started work of Thackeray Nagar Park in Niphad Cityesakal

SAKAL Impact : शहरातील ठाकरे नगरात असलेल्या उद्यानात गाढव, कुत्रे व इतर प्राण्यांचा मुक्त संचार होता. त्यामुळे येथील नागरिक संतप्त होते. या उद्यानाला आमदार दिलीप बनकरांच्या निधीतून ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र उद्यानाची वाट लागली होती. या संदर्भात ‘सकाळ’ मध्ये वृत छापून येताच खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेत निफाड शहरातील ठाकरे नगरच्या उद्यानाचे तातडीने बांधकाम सुरु केले आहे. ()

या उद्यानाच्या समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने या उपनगरातील नागरीकांना घेऊन शिवसेनेचे युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी अभियंता प्रकाश घोडे यांना सुकलेल्या फुलांचा हार घालून निषेध केला होता. दरम्यान या संदर्भात संबंधित विभागाला तसेच आमदाराचे सहाय्यक घोलप यांना वारंवार सांगूनही कामाकडे दुर्लक्ष झाले.

Yuva Sena District Chief Vikram Randhave inspecting the started work of Thackeray Nagar Park in Niphad City
SAKAL Impact : विंध्यवासिनी मंदिर परिसर, ‘टी पॉइंट’वर डांबरीकरण

सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगूनही फरक पडत नव्हता. मात्र ‘सकाळ’ ने दखल घेताच प्रशासनाने काम सुरू केले आहे. आता हे बांधकाम दर्जेदार होण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

''शहरातील ठाकरे नगर येथे आमदार निधीतून ३३ लाख रुपये खर्चून बांधलेल्या उद्यानाची पूर्ण वाट लागली होती. याबाबत अभियंत्यांना जाब विचारला अन शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिला. याबाबत ‘सकाळ’ने दखल घेताच प्रशासनाने कामास प्रारंभ केला आहे. तर अजूनही शहरातील इतर उद्यानांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.''- विक्रम रंधवे, युवासेना जिल्हाध्यक्ष निफाड

Yuva Sena District Chief Vikram Randhave inspecting the started work of Thackeray Nagar Park in Niphad City
Sakal Impact : पारोळा क्रीडा संकुलाचा होणार कायापालट; लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com