Nashik News : ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यावरच झाली प्रसूती!

Nashik : हाकेच्या अंतरावर दवाखान्यात पोहचण्या अगोदरच वर्दळीच्या रस्त्यावरच तिची प्रसूती झाली. तिला कन्यारत्न झाले. ही घटना आज रात्री नऊच्या सुमारास रेल्वे फाटकाजवळ घडली.
baby
baby esakal

Nashik News : ऊसतोडणीसाठी गेलेल्या महिलेला दुचाकीवरून घराकडे माघारी आणताना अचानक प्रसवकळा सुरू झाल्या, हाकेच्या अंतरावर दवाखान्यात पोहचण्या अगोदरच वर्दळीच्या रस्त्यावरच तिची प्रसूती झाली. तिला कन्यारत्न झाले. ही घटना आज रात्री नऊच्या सुमारास रेल्वे फाटकाजवळ घडली. ()

नगर जिल्ह्यातील एका ऊस कारखान्यावर आपल्या कुटुंबियांसोबत गेलेली मंगल ही गर्भवती महिला सासरे सुदाम व सासू लताबाई यांच्यासोबत दुचाकीवरून घरी गोंडेगावला येत असताना महिलेला प्रसवकळा सुरू झाल्या. मात्र नांदगावला पोहाचेपर्यत असहाय्य वेदना सहन कारण्यापलीकडे गेल्यावर जुन्या रेल्वे फाटकाजवळ त्रिमूर्ती फरसाण या दुकानाजवळ थांबले.

baby
Nashik News : ‘कराओके’ मुळे हौशी गायकांना हक्काचा रंगमंच; शहरात 60 क्लब

या ठिकाणी आडोशाला थांबून पायी जाणारी अन्य एक महिला व एक अज्ञात तृतीय पंथी व्यक्तीने साडीचा आडोसा करीत प्रसूतीसाठी मदत केली. ग्रामीण रूग्णालयाचे कर्मचारी राम शिंदे यांच्यासह समाजसेवक सुनील (हरीओम) सोर, जुबेर शेख, रिक्षाचालक रवी लोखंडे, पायी चालणाऱ्यां महिलांनी साडीचा आडोसा लावत क्षणाचा विलंब न करता मदत कार्य सुरू केले, त्याबद्द्ल त्यांचे कौतुक होत आहे.

baby
Nashik News : जिल्ह्यात 7 तहसीलदारांना नोटीस; महसूल वसुलीत पिच्छाडीवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com