YCMOU News : मुक्त विद्यापीठात मोडी लिपीचे प्रशिक्षण

YCMOU : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मानव्याविद्या व सामाजिकशास्र विद्याशाखा आणि राज्‍य शासनाचे पुरभिलेख संचालनालय यांच्यातर्फे कार्यशाळा झाली.
Yashwantrao Chavan for attending the Modi script workshop organized at Maharashtra Open University.
Yashwantrao Chavan for attending the Modi script workshop organized at Maharashtra Open University.esakal

YCMOU News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील (YCMOU) मानव्याविद्या व सामाजिकशास्र विद्याशाखा आणि राज्‍य शासनाचे पुरभिलेख संचालनालय यांच्यातर्फे कार्यशाळा झाली. या वेळी ‘मोडी लिपी प्रचार व प्रसार’ विषयावर उपस्‍थितांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतील सभागृहात झालेल्‍या कार्यशाळेचे प्रास्‍ताविक मानव्यविद्या व सामाजिकशास्र विद्याशाखेचे संचालक प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी केले. ( YCMOU )

विषयतज्ज्ञ पुरभिलेखाधिकारी मनोज राजपूत यांनी भूमिका कथन केली. पहिल्या सत्रात संशोधक सहाय्यक अमोल महल्ले यांनी मोडी लिपी बाराखडी आणि रेघीय पद्धती याचे प्रशिक्षण दिले. दुसऱ्या सत्रात पंकज पाटील यांनी मोडी लिपीतील संक्षिप्त शब्द व त्याच्या व्याख्येविषयी माहिती दिली. कोल्‍हापूर अभिलेखागार येथील अभिलेखाधिकारी गणेश खोडके यांनी विविध कालगणना, महाराष्ट्रातील शासकीय व अशासकीय दफ्तरखाणे याची माहिती दिली.

Yashwantrao Chavan for attending the Modi script workshop organized at Maharashtra Open University.
YCMOU News: ‘मुक्त’ च्‍या अभ्यासक्रमात आबा महाजनांची कविता

तसेच कागदपत्रांचा कालखंड कसा ओळखावा याबद्दल मार्गदर्शन केले. शहरातून सुमारे शंभराहून अधिक व्‍यक्‍तींनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला.याप्रसंगी कार्यशाळेतील सहभागींना ‘मोडी लिपी प्रचार व प्रसार’ ही पुस्तिका देण्यात आली. पुराभिलेख संचालनायल मुंबई येथून रोहित खोले आणि नरेश जोशी यांची उपस्‍थिती राहिली.

सूत्रसंचालन डॉ. संजय खरात यांनी केले. आभार प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी मानले. कार्यशाळेस मुक्‍त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन आणि कुलसचिव दिलीप भरड यांचे मार्गदर्शन लाभले.

Yashwantrao Chavan for attending the Modi script workshop organized at Maharashtra Open University.
YCMOU News : मुक्त विद्यापीठ कुलसचिवपदी दिलीप भरड! प्रदीर्घ काळापासून प्रभारींवर होती जबाबदारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com