Photograph of Aba Mahajan and textbook
Photograph of Aba Mahajan and textbookesakal

YCMOU News: ‘मुक्त’ च्‍या अभ्यासक्रमात आबा महाजनांची कविता

आबा गोविंद महाजन हे तहसीलदार या पदावर कार्यरत असून, त्‍यांच्‍या 'आबाची गोष्ट' या कथा संग्रहाला साहित्‍य अकादमी पुरस्‍कार मिळालेला आहे...

नाशिक : दूरस्‍थ शिक्षण पद्धतीतील शिक्षणात राज्‍यस्‍तरावर विस्‍तार असलेल्‍या यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या अभ्यासक्रमात आबा महाजन यांच्‍या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

विद्यापीठाच्‍या एम.ए. (मराठी) या अभ्यासक्रमात त्‍यांची ‘मन्‍हा खानदेश’ ही कविता शिकविली जाणार आहे. (poet Aba Mahajans poem in YCMOU syllabus nashik)

आबा गोविंद महाजन हे तहसीलदार या पदावर कार्यरत असून, त्‍यांच्‍या 'आबाची गोष्ट' या कथा संग्रहाला साहित्‍य अकादमी पुरस्‍कार मिळालेला आहे. तसेच यापूर्वी त्‍यांच्‍या कथा, कवितांचा विविध विद्यापीठांच्‍या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे.

शालेय पाठ्यपुस्‍तकातदेखील त्‍यांच्‍या कथांचा समावेश करण्यात आलेला आहे. नुकताच आबा महाजन यांच्‍या 'मन्‍हा खानदेश' या कवितेचा मुक्‍त विद्यापीठाच्‍या अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे.

Photograph of Aba Mahajan and textbook
Nashik Congress News: अद्यापही नैराश्यात अडकलेला पक्ष...

'साहित्‍यातील प्रवास भाग-२’ या एम.ए. मराठीच्‍या अभ्यासक्रमात आता ही कविता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. विशेष म्‍हणजे नियमित शिक्षणापासून दुरावलेल्या परंतु शिक्षणाची तीव्र इच्‍छा असलेल्‍या विविध घटकातील विद्यार्थ्यांना आता ही कविता अभ्यासायला मिळणार आहे.

"मन्‍हा खानदेश ही कविता किशोर मासिकाच्‍या हिवाळी अंक २०१३ मध्ये प्रकाशित झालेली आहे. मासिकातून थेट विद्यापीठाच्‍या अभ्यासक्रमात या कवितेचा सन्‍मान होणे ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे."- आबा महाजन

Photograph of Aba Mahajan and textbook
Nashik News: यात्रा-जत्रांमधून ग्रामीण अर्थकारणाचे फिरू लागले चक्र! वर्षभराच्या रोजी-रोटीची व्यवस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com