NMC Tax Recovery : उद्दिष्टपूर्तीसाठी अवघे 4 दिवस शिल्लक; सुटीच्या दिवशीही कर भरणा कार्यालये सुरू

Tax Recovery : घर व पाणीपट्टीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने महापालिकेच्या विविध कर विभागाकडून मार्चअखेरपर्यंत सुटीच्या दिवशीही कर भरणा कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
NMC Tax Recovery
NMC Tax Recoveryesakal

NMC Tax Recovery : घर व पाणीपट्टीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने महापालिकेच्या विविध कर विभागाकडून मार्चअखेरपर्यंत सुटीच्या दिवशीही कर भरणा कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरपट्टीचे उद्दिष्ट २१० कोटींचे ठेवले, त्यापैकी १९३ कोटी रुपये वसुल झाले. पाच दिवसात १५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. (nashik NMC Tax payment office open even on sunday holiday marathi news )

केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोग मार्गदर्शक सूचनेनुसार मालमत्ता, पाणीपट्टी, व्यावसायिक गाळ्यांचे शंभर टक्के वसुली होणे आवश्‍यक आहे. शहराच्या विकासात व शहरातील मोठे प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती, आगामी होणारा सिंहस्थ कुंभमेळा, शहरासाठी रिंगरोड इत्यादी सर्व बाबी पंधराव्या वित्त आयोगात समाविष्ट असून विकासासाठी शंभर टक्के वसुली पूर्ण झाल्यानंतर शासनाला महापालिकेचे अनुदान प्राप्त होणार आहे.

या सर्व बाबींचा विचार करता सर्व मिळकतधारक, थकबाकीदारांनी चालु आर्थिक वर्षाच्या शिल्लक चार दिवसात मागणीची रक्कम व थकबाकी भरणे आवश्‍यक आहे. त्यामुळे कर भरणा करण्याचे आवाहन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी केले आहे. (latest marathi news)

NMC Tax Recovery
NMC Tax Recovery : नाशिक शहरातील 44 हजार थकबाकीदारांना नोटिसा

एप्रिलपासून जप्ती

मार्चअखेर नंतर मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यांची चलत व स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर ज्या नळ कनेक्शन धारकांनी त्यांची थकबाकी अद्याप भरली नाही त्या थकबाकीदारांचे पाणीपुरवठा खंडित करण्याचे कार्यवाही केली जाणार आहे. थकबाकीदारांनी त्यांची थकीत पाणीपट्टी भरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मालमत्ता कर लागू करावा

शहरातील ज्या मिळकत धारकांनी वाढीव बांधकामे केली आहेत. किंवा वापरात बदल केले किंवा टेरेसचा अनधिकृत वापर केला अशा मिळकत धारकांनी स्वतःहून महापालिकेला कळवून मालमत्ता कर लागू करून घ्यावा अन्यथा अनधिकृत गैरवापर करणाऱ्या मिळकतींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

''शहरातील मिळकत धारकांनी मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यावसायिक गाळे आदींची थकबाकी त्वरित भरून महापालिकेला सहकार्य करावे, ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशी देखील भरणा स्वीकारला जाणार आहे.''- डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

NMC Tax Recovery
NMC Tax Recovery : बड्या थकबाकीदारांविरुद्ध 1 फेब्रुवारीपासून मोहीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com