Nashik News : दीड तोळ्याची सोन्याची पोत पोलिसपाटलांनी केली परत; ममदापूरच्या बाळासाहेब वैद्यांचा प्रमाणिकपणा

Nashik News : नैतिकता ढासळलेल्या सध्याच्या आव्हानात्मक व प्रतिकूल काळात माणुसकी अन्‌ प्रामाणिकपणाचा झरा आटत चालला आहे.
Villagers felicitating Police Patil Balasaheb Vaidya.
Villagers felicitating Police Patil Balasaheb Vaidya.esakal

येवला : नैतिकता ढासळलेल्या सध्याच्या आव्हानात्मक व प्रतिकूल काळात माणुसकी अन्‌ प्रामाणिकपणाचा झरा आटत चालला आहे. मात्र, अशातही समाजात काही देव माणसे आहेत, की त्यांच्या निस्वार्थी बाण्यामुळे समाजाची बांधिलकी, चांगुलपणा टिकून आहे. याचे उत्तम उदाहरण ममदापूर येथे दिसून आले. (Nashik gold jewelry returned to police at Mamdapur marathi news)

पूर्व भागातील ममदापूरहून येवल्याकडे जाणाऱ्या कोळगाव-ममदापूर मार्गावरून रविवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास ममदापूरचे पोलिसपाटील बाळासाहेब वैद्य जात असताना, त्यांना रस्त्यावर सोन्याची पोत (मंगळसूत्र) निदर्शनास आली. त्यांनी ती पोत ताब्यात घेतली. सापडलेली सोन्याची पोत कोणाची आहे, याची चौकशी सुरू केली.

याच रस्त्याने ममदापूर येथील बाबासाहेब गुडघे यांच्याकडे चांदवड तालुक्यातील नातेवाईक गेले होते. त्या महिलेचीही पोत हरविल्याची माहिती त्यांना मिळाली. सापडलेली सोन्याची पोत चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथील अशोक ठाकरे यांच्या पत्नीची आहे, या माहितीची खात्री करून घेतली आणि उर्धुळ येथील अशोक ठाकरे यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून त्यांनी हे मंगळसूत्र ममदापूर येथील बाबासाहेब गुडघे यांच्याकडे सुपूर्द केली. (Latest Marathi News)

Villagers felicitating Police Patil Balasaheb Vaidya.
NMC News : पाणीपुरवठा योजनांसाठी केंद्राकडून 342 कोटी

आजच्या काळात रस्त्यावर सापडलेले रुपयाचे नाणेही माणूस जपून ठेवतो. श्री. वैद्य यांनी दाखविलेल्या औदार्यामुळे उर्धुळ गावच्या ठाकरे कुटुंबाचा अलंकार परत मिळाला. यामुळे ममदापूरचे पोलिसपाटील बाळासाहेब वैद्य यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ममदापूर येथील बाबासाहेब गुडघे, अनिल गुडघे यांनी श्री. वैद्य यांचा सत्कार केला. बाबासाहेब गुडघे, मच्छिंद्र साबळे, अनिल गुडघे, ज्ञानेश्वर वैद्य, बाबूराव गुडघे, मच्छिंद्र साबळे, दत्तू गुडघे, शिवाजी जगदळे, बाबासाहेब कोल्हे आदी उपस्थित होते.

Villagers felicitating Police Patil Balasaheb Vaidya.
Nashik ZP Sport Competition : महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या मैदानावर रंगणार जि.प. स्पर्धा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com