Manipur Violence : हिंसाचाराने धुमसणाऱ्या मणिपूरला नाशिकचा कांदा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे ट्विट

Armed police deployed here when a freight train carrying onions arrived and Railway Minister Ashwini Vaishnav's tweet
Armed police deployed here when a freight train carrying onions arrived and Railway Minister Ashwini Vaishnav's tweet esakal

Manipur Violence : नाशिक जिल्हा हा कांद्याचे आगर म्हणून ओळखला जातो. हाच कांदा मनमाड येथून रेल्वेने थेट हिंसाचाराने धुमसणाऱ्या मणिपूरला पोहोचला आहे.

कांद्याने भरलेली ही मालगाडी दोन हजार ८०१ किलोमीटरचे अंतर कापत सशस्त्र पोलिस बंदोबस्तात मणिपूरमधील खोंगसोंग रेल्वेस्थानकात दाखल झाली. (Nashik onion to Manipur by rail for first time in Northeast India nashik news)

पहिल्यांदाच ईशान्य भारतात रेल्वेने कांदा पोहोचविला गेल्याने या महत्त्वपूर्ण घटनेची दखल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली असून, तसे ट्विट त्यांनी केले आहे.

देशभरातून मनमाड रेल्वेस्थानकातून विविध प्रकारचा शेतमाल पाठविला जातो. याच स्थानकांतर्गत असलेल्या अंकाई येथील मालधक्क्यावरून मालगाडी कांद्याने भरण्यात आली. येथून दोन हजार ८०१ किलोमीटरचे अंतर कापत ही रेल्वेगाडी खोंगसोंग (मणिपूर) येथे पोहोचली.

तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराने धुमसत आहे. यात नाशिक जिल्ह्यातील कांदा मणिपूरच्या बाजारपेठेत पोहोचला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Armed police deployed here when a freight train carrying onions arrived and Railway Minister Ashwini Vaishnav's tweet
Nashik Rain News : घाट विभागात आज जोरदार अन उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

जिल्ह्यात उत्पादित होणारा हा कांदा रेल्वे वॅगनद्वारे मनमाड रेल्वेस्थानकातून परराज्यांत पाठविला जातो. प्रामुख्याने उत्तर भारत आणि पश्चिम बंगालमध्ये हा कांदा मोठ्या प्रमाणात जात असतो.

प्रथमच ईशान्य भारतात रेल्वेद्वारे मिश्रमाल वाहतूक जीवनावश्यक वस्तू असलेल्या कांद्यासह बटाटा, तांदूळ, साखर आणि इतर खाद्यपदार्थ घेऊन ही रेल्वे मालगाडी मणिपुरात दाखल झाली. देशात सर्वदूर जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वे कटिबद्द असल्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने या निमित्ताने दिली आहे.

Armed police deployed here when a freight train carrying onions arrived and Railway Minister Ashwini Vaishnav's tweet
Nashik News : प्रसूतिवेदना सहन करीत महिलेची अडीच किलोमीटर पायपीट! मृतदेह नेण्यासाठी करावी लागली डोली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com